एक्स्प्लोर
खुशखबर! ॲपल कंपनीने लॉन्च केला नवा फोन, जाणून घ्या iPhone 16e चे भन्नाट फिचर्स, किंमत नेमकी किती?
iPhone 16e launched : अॅपल कंपनीने नुकतेच iPhone 16e हा नवाकोरा फोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये अत्यंत आधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत.

iphone 16e launched
1/9

गेल्या अनेक दिवसांपासून ॲपलच्या नव्या फोचनी चर्चा होती. ॲपल आपला iPhone SE 4 हा फोन नव्याने लॉन्च करणार असल्याचे म्हटले जात होते.
2/9

असे असतानाच आता ॲपलने iPhone SE 4 म्हणजेच iPhone 16e (आयफोन 16e) लॉन्च केला आहे. आज या फोनची ॲपलच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या फोनची ॲडव्हान्स बुकिंग येत्या 21 फेब्रुवारीपासून करता येणार आहे.
3/9

नव्याने लॉन्च झालेल्या iPhone 16e या फोनमध्ये अॅपल इन्टेलिजन्स आहे. सोबतच हा आयफोन 11 च्या तुलनेत या फोनमध्ये 9 तास अतिरिक्त व्हिडीओ प्लेबॅक आहे.
4/9

iPhone 16e या फोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा रेअर कॅमेरा असणार आहे. सुपर हाय रिझोल्यूशनचा हा कॅमेरा असेल. या फोनला सिरॅमिक शिल्डही असेल.
5/9

अॅपल फोनच्या अधिकृत संकेतस्थळानुसार iPhone 16e या फोनची किंमत 59900 हजार रुपये असणार आहे. 2496 रुपयांच्या प्रतिमहिन्याच्या ईएमआयवरही तुम्ही हा फोन खरेदी करू शकता.
6/9

या फोनमध्ये टचआयडीच्या ऐवजी फेस आयडीची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच या फोनला तब्बल 6.1 इंची OLED डिस्प्ले असेल. सोबतच या फोनला सी-टाईप चार्जिंग स्लॉट असेल.
7/9

या फोनला म्यूट स्वीचऐवजी थेट अॅक्शन बटन देण्यात येईल. या फोनमध्ये पॉवरफुल असलेली A18 chip असेल.
8/9

अॅपल कंपनीने आयफोन 16 मध्ये अॅपल इंटेलिजेन्सची सुविधा देलेली आहे. हीच सुविधा आता iPhone 16e या फोनमध्ये देण्यात आलेली आहे.
9/9

iPhone 16e
Published at : 19 Feb 2025 10:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
