कोरोना काळात रात्र-दिवस काम करणाऱ्या पोलिसांना केवळ 750 रुपयांची 'दिवाळी भेट'
Mumbai Police : मुंबई पोलिसांना दिवाळी भेट म्हणून 750 रुपये देण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्तांच्या नावे जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
![कोरोना काळात रात्र-दिवस काम करणाऱ्या पोलिसांना केवळ 750 रुपयांची 'दिवाळी भेट' Mumbai Police Diwali Bonus announced just 750 rupee as a gift maharashtra govt कोरोना काळात रात्र-दिवस काम करणाऱ्या पोलिसांना केवळ 750 रुपयांची 'दिवाळी भेट'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/29/7a3338ca8ac7f6f0bc96442eb1e99547_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत मोडल्या जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून भरघोस दिवाळी भेट जाहीर करण्यात आली आहे. कोरोना काळात दिवस-रात्र नागरिकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून कायदा व सुवस्थेचं काम पाहणाऱ्या मुंबई पोलिसांना सरकारने मात्र केवळ 750 रुपये दिवाळी भेट जाहीर केली आहे.
राज्यातील इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या रक्कमेची दिवाळी भेट जाहीर केली असताना पोलिसांना मात्र तुटपूंजी भेट जाहीर केल्याने पोलिसांमध्ये नाराजीचं वातावरणं आहे. मुंबई पोलिसांना दिवाळी भेटीच्या निमित्ताने सबसिडी कँटिनमधून त्याच्या नावे डेबिट व क्रेडिट कार्डवर 750 रुपये (प्रति कर्मचारी) इतक्या रकमेची खरेदी विनामूल्य करता येणार आहे. ही भेट पोलिसांसाठी असलेल्या पोलीस कल्याण निधीतून दिली जाणार आहे.
ठरलेल्या रक्कमेच्या वरती खरेदी केल्यास ते पैसे त्यांना खिशातून द्यावे लागणार आहे. या संबंधीचे पत्र मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या नावे काढण्यात आलं आहे. एकीकडे पालिका, बेस्ट कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांना भरघोस दिवाळी बोनस दिला जात असताना पोलिसांना मात्र 750 रुपये दिवाळी भेट देऊन त्याची चेष्ठा केल्याची चर्चा पोलिस दलात आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांना 20 हजारांची भेट
मुंबईच्या बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी मात्र गोड बातमी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका या दिवाळीत बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दिवाळी बोनस देणार आहे. कर्मचाऱ्यांना पुढील तीन वर्ष 20 हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना खुश करण्यात आले आहे.
सध्या मुंबई पालिकेत एक लाखांहून अधिक कर्मचारी आणि बेस्टचे 34 हजार कर्मचारी आहे. या निर्णयामुळे दिवाळी गोड होणार आहे. कोरोना संकटामुळे पालिकेलाही आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान कोरोना परिस्थिती पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले आहे. यामुळे यंदाच्या दिवाळी पालिकेच्या सर्व कामगार, कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, प्रत्येकी 20 हजारांचा दिवाळी बोनस
- MSRTC Staff Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी, महागाई भत्त्यासह दिवाळी बोनस जाहीर
- Thane TMC : आर्थिक संकटात असलेल्या ठामपाच्या कर्मचाऱ्यांना 15,500 दिवाळी बोनस, महापौर नरेश म्हस्के यांनी केली घोषणा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)