एक्स्प्लोर

PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 

PM Kisan Samman Nidhi Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून वर्षाला शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत दिली जाते. या योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. PM किसान योजनेत पारदर्शकता यायला हवी. तसेच खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्याला या योजनेचा फायदा घेता यावा. यासाठी केंद्र सरकारने या योजनेच्या नियमात बदल केला असेल असं मला वाटतं असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळं आता केंद्र सरकारनं नेमका पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत कोणता बदल केला असेल? अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. 

PM किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळणार

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत 4 महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता या प्रमाणे दिली जाते. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना जीएम किसान योजनेचे 18 हप्ते मिळाले आहेत. 19 वा हप्ता कधी मिळणार अशी देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. लवकरच म्हणजे पुढच्या फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत कोणताही माहिती मिळाली नाही. मात्र, अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकारने या योजनेच्या नियमात बदल केला असेल असं मला वाटतं असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

विश्वासाने सर्व लोक प्रवेश करत आहेत

निफाड, दिंडोरी, नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसह नागपूरचे दुशंतचे चतुरवेदी ( माजी आमदार ) यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं. संपूर्ण राज्यातून शिवसेनेत प्रवेशाचा ओढा सुरु आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन प्रवेश केला जातोय असेही शिंदे म्हणाले. विधासभेत 60 आमदार देऊन जनतेने शिक्कामोर्तब केला आहे. विश्वासाने सर्व लोक येत आहेत असेही शिंदे म्हणाले. कल्याणकारी आणि लोकांभिमुख योजनेची पोचपावती आम्हाला मिळतेय.  राज्यबाहेरील कार्यकर्ते, पदाधिकारी पक्षात येत आहेत असे शिंदे म्हणाले. 

शिवसेना मोठ्या वेगाने पुढे जात आहे

शिवसेना मोठ्या वेगाने पुढे जातं आहे. राज्यात जिथे जिथे विकासाची आवशकता आहे तिथे तिथे आम्ही विकास करु या विशस्वासाने लोक येत आहेत असे शिंदे म्हणाले. आजचं स्वामीत्व योजना जाहीर केली आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम मोदी करत आहेत. आज 65 लाख लोकांना लाभ मिळाला असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. PM किसान योजनेत पारदर्शकता यायला हवी, खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्याला या योजनेचा फायदा घेता यावा, प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा फायदा घेता यावा यासाठी केंद्राने नियमात बदल केला असेल असं मला वाटत असेही शिंदे म्हणाले. विचारांशी तडजोड आणि बाळासाहेबांचे विचार सोडल्याने उबाठाची लोक येत आहेत. जिथे जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणुका आहेत तिथे तिथे आम्ही महायुती म्हणून निवडणुका लढवणार आहोत. काही ठिकाणी परिस्थिती नुसार कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wankhede Stadium's 50th Anniversary : वानखेडे स्टेयमची निर्मिती करणारे शशी प्रभूंसोबत 'माझा'चा संवादLadki Bahin Yojana Update : अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार;कोल्हे म्हणतात, बहिणींनी दिलेली मतं  सुद्धा परत देणार का?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 January  2024Kolhapur Boy On Buldhana Hair Loss | माझ्या औषधामुळे बुलढाण्यातील टक्कल पडलेल्यांना केस येऊ शकतात,'या' तरुणाचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget