Mumbai : मुंबई, नवी मुंबई ते कल्याण - बदलापूर प्रवास होणार गतिमान! प्रवाशांचा वेळ वाचणार, लवकरच नवीन मार्गाचा आराखडा तयार होणार
Mumbai : ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर यासारख्या शहरांपासून काही अंतरावर अनेक राज्यमार्ग, महामार्ग जातात. मात्र नागरिकांना शहरातून महामार्गापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा वेळ लागतो.
![Mumbai : मुंबई, नवी मुंबई ते कल्याण - बदलापूर प्रवास होणार गतिमान! प्रवाशांचा वेळ वाचणार, लवकरच नवीन मार्गाचा आराखडा तयार होणार Mumbai Navi Mumbai to Kalyan Badlapur travel will be speedy Time of passengers will be saved new route plan will be prepared soon Mumbai : मुंबई, नवी मुंबई ते कल्याण - बदलापूर प्रवास होणार गतिमान! प्रवाशांचा वेळ वाचणार, लवकरच नवीन मार्गाचा आराखडा तयार होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/01/f9b23955396b794eda8e1febbb92844a1709280272877381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai : मुंबईत प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबई, नवी मुंबई (Navi Mumbai) ते कल्याण (Kalyan) - बदलापूर (Badlapur) प्रवास गतिमान होणार आहे. यामुळे अनेक प्रवाशांचा वेळ वाचणार असून या नवीन मार्गाचा आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी, अडथळ्यांचा प्रवास संपणार!
सध्या मुंबई महानगर प्रदेशात ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर यासारख्या शहरांपासून काही अंतरावर अनेक राज्यमार्ग, महामार्ग जातात. मात्र या महामार्गांमध्ये संलग्नता नसल्याने नागरिकांना शहरातून महामार्गापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा वेळ खर्च घालावा लागतो. तसेच या शहरांमधून नवी मुंबई, मुंबई या शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी थेट मार्ग नाही. ही शहरे गाठण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गांवरून अडथळ्यांचा प्रवास करावा लागतो.
कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणारा मार्ग
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्यासोबत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात या मार्गाच्या उभारणीबाबत खासदार आणि अधिकाऱ्यांची चर्चा झाली. यात मुंबई, नवी मुंबई ते कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरातून ये-जा करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीशिवाय महामार्ग गाठण्यासाठी स्वतंत्र नियंत्रित प्रवेश असलेल्या मार्गाची उभारणी करण्याची संकल्पना मांडण्यात आली. यापूर्वी झालेल्या बैठकीतही यावर प्राथमिक चर्चा झाली होती. मात्र आज झालेल्या बैठकीत प्रस्तावित नवीन मार्गामुळे नवी मुंबई शहर, तळोजा ही औद्योगिक वसाहत, खोणी आणि 27 गावे, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर यासह कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणार आहे. त्यामुळे शहरातून 10 मिनिटात बाहेर पडता येईल.
अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा, आराखडा तयार केला जाणार
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्यासोबत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी होऊन या मार्गाच्या उभारणीबाबत खासदार आणि अधिकाऱ्यांची चर्चा झाली. याबाबतचा सविस्तर प्रकल्प आराखडा लवकरच सादर केला जाणार आहे. यासह आज इतर विविध विषयांवर चर्चा झाली. मुंबई, नवी मुंबई ते कल्याण - बदलापूर एकमेकांना रस्ते मार्गाने जोडण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी एम एम आर डी ए, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत नवीन मार्ग कसे निर्माण करतील यावर चर्चा केली आणि लवकरच याबाबत सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला जाणार आहे.
शहरातील रस्ते जोडण्याबाबत काय चर्चा झाली?
- Access control रस्त्याला जोडण्यासाठी विविध शहरांतून मार्ग उभारणे
- कोपर ते कळवा रेतीबंदर असा नवा किनारी मार्ग उभारून तो ठाणे किनारी (Coastal road) मार्गाला जोडला जाईल.
- चक्कीनाका ते श्री मलंगगड असा नवा उन्नत मार्ग उभारणे, त्याचा आराखडा तयार करणे.
- नेवाळी येथे उड्डाणपूल उभारणे, त्यासाठी डबल डेकर उन्नत मार्ग उभारणे, त्याच्या पहिल्या मजल्यावर रस्ते तर वरच्या मजल्यावर मेट्रो १४ साठी व्यवस्था करणे.
- एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करणे
हेही वाचा>>>
Samruddhi Mahamarg : समृध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाची तारीख अखेर ठरली! भरवीर ते इगतपुरी असेल तिसरा टप्पा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)