एक्स्प्लोर
Share Market Sensex: शेअर मार्केटमध्ये 2008 पेक्षा वाईट वेळ येणार? गुंतवणुकदारांना बाजारातून पैसे काढण्याचा सल्ला
Share Market Sensex Nifty: केवळ पाच दिवसात 18 लाख कोटी स्वाहा, स्टॉक मार्केटमध्ये धूळधाण, शेअर मार्केट इतकं का पडलं? गुंतवणुकदार सध्या प्रचंड चिंतेत पडले आहेत.

Share Market Sensex nifty
1/7

भारतीय शेअर बाजारात सध्या प्रचंड मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स 2300 अंशांनी पडला आहे. त्यामुळे भारतीय गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
2/7

या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत मोठी अलर्ट देण्यात आला आहे. आयसीआयसीआय प्रुडेंशियल एएमसी (ICICI Pru AMC) चे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर एस. नरेन यांनी मिड आणि स्मॉल-कॅप शेअर्समधील गुंतवणुकीसंदर्भात सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते सध्या मिड आणि स्मॉल कंपन्यांमधून पैसे काढून घेणे शहाणपणाचे ठरेल.
3/7

मिड आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक मोठ्या जोखमीची ठरू शकते. या कंपन्यांचे समभाग सध्या खूप महाग झाले असून बाजारात मोठी अस्थिरता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यामधून पैसे काढणे अधिक सुरक्षित ठरेल, असे एस. नरेन यांनी IFA Galaxy 2025 परिषदेत म्हटले.
4/7

2008-2010 नंतर 2025 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरु शकते. पूर्वी बँका आणि मोठ्या कंपन्या जोखीम घेत होत्या. मात्र, आता सामान्य गुंतवणूकदार थेट शेअर बाजारात पैसे गुंतवत आहेत. अनेक कंपन्या बँकांकडून कर्ज घेण्याऐवजी गुंतवणूकदारांकडून थेट पैसे उभे करत आहेत. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता येण्याची दाट शक्यता आहे.
5/7

एरवी भांडवली बाजारात SIP हा गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता SIP मधूनही यावेळी चांगले रिटर्न मिळतीलच याची खात्री नाही. गेल्या काही दिवसांमध्ये एसआयपी गुंतवणुकदारांना त्याचा प्रत्यय येत आहे.
6/7

शेअर बाजारात विक्रीचं सत्र सुरु असताना कमी किमतीवर स्मॉल कॅप आणि मिड कॅपमधील गुंतवणूक महागात पडू शकते. यापूर्वी 1994-2002 आणि 2006-2013 मध्ये एसआयपीधारकांना नुकसान सहन करावं लागलं होतं. त्या काळात मिडकॅपमधून रिटर्न मिळाले नव्हते. गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले होते.
7/7

टॉप इन्वेस्टमेंट सल्लागार नरेन यांनी महागड्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणं कमी जोखमीचं असेल, असे म्हटले आहे.
Published at : 12 Feb 2025 07:51 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
राजकारण
विश्व
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion