नवऱ्याने केली दुसरी बायको ...पदरात चार मुलं; लेकाची कॉलेज फी भरण्यासाठी माय बनली चोर
औरंगाबादमध्ये महिलेची तीन मुलं आणि एक मुलगी असा संसार आहे. आजारी असल्याने उपचारासाठी मुंबईत आली होती. कल्याण येथे विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या आपल्या भावाकडे आली आहे.

मुंबई : हातात नोकरी नाही...नवऱ्याने दुसरी बायको केली... पदरात चार मुलं... त्यांचे शिक्षण कसे करायचे हा प्रश्न... शाळेची फी भरण्यासाठी पैसे हवे होते. ते आणायचे कोठून हा प्रश्न सुटत नसल्यामुळे तीने चोरी करण्याचे ठरवले. डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं. मग तिने गर्दीचा फायदा घेत एका महिलेची चेन हिसकावली. मात्र पोलीस तपासात तिची चोरी (Kalyan Crime News) पकडली गेली. मुलांच्या उदरनिर्वाहासाठी हे पाऊल उचलल्याची कबुली तीने पोलीसांसमोर दिली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमध्ये ही महिला वास्तव्यास आहे. नवऱ्याने दुसरी बायको केली, हातात नोकरी नाही. पण काही छोटे मोठे काम करून आपल्या मुलांचे पालन पोषण करत होती. यादरम्यान 12 वीत शिकणाऱ्या मोठ्या मुलाची फी भरायची होती. अचानक एवढे पैसे कसे या विवंचनेत असताना तिने चोरीचा मार्ग पत्करला. कल्याण-शहाड दरम्यान गर्दीचा फायदा घेत धावत्या लोकलमध्ये एका महिलेची चेन हिसकावली. तिथून विठ्ठलवाडीला निघून गेली.
सीसीटीव्ही फुटेच्या आधारे महिलेचा शोध
मात्र ज्या महिलेची चेन चोरी झाली त्या महिलेने कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले यामध्ये एक तोंडाला स्कार्फ घातलेली महिला आढळून आली. या महिलेवर संशय बळावला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच्या आधारे या महिलेचा शोध सुरू केला.
महिला पोलीसांच्या ताब्यात
सीसीटीव्हीच्या माध्यमातून तिचा शोध घेत असताना ही महिला विठ्ठलवाडी स्टेशनला उतरली समोर आले. विठ्ठलवाडी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तिच्या घरापर्यंत पोहोचले. महिलेला अटक केल्यानंतर तिने चोरलेले दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले.पोलिसांनी तिच्यावर सहा ते सात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती चोरी करत असल्याचं तिने सांगितले. औरंगाबादमध्ये महिलेची तीन मुलं आणि एक मुलगी असा संसार आहे. आजारी असल्याने उपचारासाठी मुंबईत आली होती. कल्याण येथे विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या आपल्या भावाकडे आली आहे.
हे ही वाचा :
Kalyan Crime News: पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल; कल्याणमध्ये शाळकरी विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
