Top 70 at 07AM Superfast 28 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या
Top 70 at 07AM Superfast 28 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सदर प्रकरणातील दोन कोटींच्या खंडणीप्रकरणी मोका लागलेले आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याला मिळत असलेल्या विशेष ट्रिटमेंटबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक्सवर पोस्ट करत निशाणा साधला आहे.
सदर सरकारने कै. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरूवातीपासूनच गुन्हेगारांना वाचवण्याचा ठेकाच घेतल्याची ठाम भावना महाराष्ट्राच्या जनतेची झाली आहे. यात भर म्हणजे खंडणी व हत्या प्रकरणातील मोकका लागलेल्या आरोपी वाल्मिक कराडला खास ट्रिटमेंट देण्याचे काम सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात हे करत असल्याची चर्चा आहे. आरोपी कराडला आराम करता यावा यासाठी हॉस्पिटलमधील एक वॉर्ड रिकामा करण्यात आला हे दुर्देवी आहे. त्याचबरोबर थोरातांवर ठराविक पद्धतीने अहवाल सादर करण्यासाठी दबाव टाकला गेला असल्याची व तो कोणी टाकला याविषयी शंका व्यक्त होत आहे. मुळात आरोपी कराडला खरंच आरोग्याची तक्रार असेल, तर त्याच्यावर K.E.M. सारख्या हॉस्पिटलमधे उपचार करण्यात यायला हवे, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.



















