एक्स्प्लोर

Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह

GBS Outbreak Kolhapur News: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव. आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली. नागपुरात 3 रुग्ण आढळले आहेत.

कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्यादृष्टीने चिंतेचा विषय ठरत असलेल्या गुलेन बॅरी सिंड्रोमचा (Guillain Barre Syndrome) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. आतापर्यंत केवळ पुण्यात या आजाराचे रुग्ण आढळत होते. परंतु, आता कोल्हापूरमध्येही दोघांना गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही रुग्णांवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी एक रुग्ण कर्नाटकातील कोगणोळी इथला तर दुसरा हुपरी येथील असल्याचे समजते. हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन प्रशासन आणि राज्य सरकारकडून सातत्याने केले जात आहे. मात्र, तरीही जीबीएसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

सध्याच्या घडीला पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे सर्वाधिक 111 रुग्ण आहेत. यामध्ये 68 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे. यापैकी 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या 17 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोममुळे एका व्यक्तीचा जीव गेला आहे. हा रूग्णदेखील पुण्यात राहणारा होता. मात्र, त्याचा मृत्यू सोलापूरमधील खासगी रुग्णालयात झाला होता. पु्ण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकार सतर्क झाले आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी यासंदर्भात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची वाढती संख्या पाहून केंद्र सरकारही अलर्ट झाले आहे. गेल्या आठ दिवसात या आजाराच्या रुग्णांची संख्या 100 पेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सोमवारी सात जणांच्या तज्ज्ञांचे पथक राज्यात तैनात केले आहे. हे पथक वाढत्या रुग्णसंख्येचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहे.

बाधित जिल्ह्यांमध्ये सर्व्हे होणार

पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे महानगरपालिका युद्धपातळीवर कामाला लागली आहे. पुण्यात आता घरोघरी सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून आतापर्यंत तब्बल 25 हजार घरांमध्ये सर्व्हे पूर्ण झाला आहे. याशिवाय, हा आजार राज्यातील इतर भागात पसरु नये, यासाठी शीघ्र प्रतिसाद पथकांना बाधित भागाला भेट देऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांच्या शौच आणि रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामधील काही सॅम्पल्समध्ये नोरो व्हायरस, कॅम्फेलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग आढळून आला आहे. पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमुख कारण दूषित पाणी असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील 80 टक्के रुग्ण हे नांदेड परिसरात पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या विहिरीच्या परिसरातील आहेत. 

आणखी वाचा

पुण्यात जीबीएसची रूग्णसंख्या शंभरी पार; 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर, केंद्र अलर्ट, पुण्याला पाठवले तज्ज्ञांचे पथक

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
Embed widget