एक्स्प्लोर

43 किमीच्या पाईलाईनकरता कांदळवनाच्या कत्तलीची हायकोर्टाकडून परवानगी, माहुल ते रसायनी पेट्रोलियम पाईपलाईनचा मार्ग मोकळा

भारत पेट्रोलियम ही कंपनी मुंबई ते रायगडपर्यंत 43 किमी. पाईपलाईन टाकणार आहे. हा एक जनहितार्थ प्रकल्प आहे, त्यामुळे त्यासाठीआवश्यक असलेली तिवरांची कत्तल करण्यास हायकोर्टानं परवानगी दिली होती.

Petroleum Pipeline from Mumbai to Raigad : पेट्रोलियम पदार्थ माहुलहून रायगडला (Raigad News) नेणाऱ्या पाईपलाईनला हायकोर्टानं हिरवा कंदील दाखवला आहे. या पाईपलाईनसाठी होणा-या तिवरांची कत्तल करण्यास हायकोर्टानं (High Court) प्रशासनाला परवानगी दिली आहे. 43 किमीच्या पाईलाईनकरता कांदळवनाच्या कत्तलीची हायकोर्टाकडून  (Mumbai High Court)  परवानगी देण्यात आली आहे. भारत पेट्रोलियमचा हा प्रकल्प जनतेच्या हिताचा असल्याचं मत हायकोर्टाकडून नोंदवण्यात आलेय. 

भारत पेट्रोलियम ही कंपनी मुंबई ते रायगडपर्यंत 43 किमी. पाईपलाईन टाकणार आहे. हा एक जनहितार्थ प्रकल्प आहे, त्यामुळे त्यासाठीआवश्यक असलेली तिवरांची कत्तल करण्यास हायकोर्टानं परवानगी दिली होती. मात्र महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व संवर्धन कायद्यांतर्गत कंपनीनं परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे हायकोर्टानं दिलेली परवानगी रद्द करावी, अशी मागणी करत पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी हायकोर्टात अर्ज केला होता. 

यावर आम्ही सर्व संबंधित विभागाच्या परवानग्या घेतल्या आहेत, असा दावा करत कंपनीनं त्याचा तपशील हायकोर्टात सादर केला. तो ग्राह्य धर न्यायमूर्ती ए, एस. चांदुरकर व न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठानं झोरू बाथेना यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे माहुल ते रसायनी पेट्रोलियम पाईपलाईनचा मार्ग मोकळा झाला आहे. 

काय आहे प्रकरण ?

रायगडमधील रसायनी इथं माहुल येथून सतत पेट्रोलियम पदार्थ पाठवावे लागतात. रेल्वेनं याची वाहतूक करता येणार नाही, रस्ते मार्ग धोक्याचे आहेत. त्यामुळे पाईपलाईनद्वारेच हे किफायतशीर व सहज शक्य आहे. यासाठी संबंधित सर्व विभागाच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या मार्गात तब्बल 10 हजार 582 तिवरांची झाडे आहेत. या पाईपलाईनसाठी ही झाडे कापावी लागतील. त्यामुळे त्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी याचिका कंपनीनं हायकोर्टात केली होती. त्याची दखल घेत हायकोर्टानं कंपनीला तिवरांची झाडे कापण्यास परवानगी दिली.

आणखी वाचा :

विकासकामांकरिता शेकडो एकर कांदळवनाची कत्तल करता आणि एका तिवरासाठी बांधकाम थांबवता? हायकोर्टाची नाराजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget