एक्स्प्लोर
नवी मुंबईत कुमारी मातेसह अर्भकाचा मृत्यू, प्रियकराविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : गर्भपातासाठी गोळ्या दिल्याने अतिरक्तस्राव होऊन अल्पवयीन मुलगी आणि तिच्या पोटातील सात महिन्याच्या अर्भकाचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतील कळंबोलीत ही घटना घडली. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणातील मृत अल्पवयीन मुलगी आणि अल्पवयीन मुलगा दोघेही कळंबोलीत राहतात. मुलाचे मृत मुलीसोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबध होते. यादरम्यान त्याने पीडित मुलीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गरोदर राहिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
गरोदर राहिल्याचे पीडित मुलीने सांगितल्यानंतर तिचा गर्भपात व्हावा यासाठी प्रियकराने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे रविवारी दुपारी पीडित मुलीला अतिरक्तस्राव झाला. यातच तिचा आणि तिच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर पीडित मुलीच्या पालकांनी तिला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. कळंबोली पोलिसांनी तरुणावर बलात्कारासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement