एक्स्प्लोर
MP Salary Appraisal: खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
Centre announces MPs salary hike: सध्या मार्च महिना असल्याने सर्वत्र पगारवाढीची चर्चा आहे. मात्र, खासदारांना मार्च महिना संपण्यापूर्वीच मोठी पगारवाढ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Salary Appraisal MPS
1/7

लोकसभा आणि राज्यसभेच्या आजी-माजी खासदारांचे वेतन व भत्त्यांमध्ये 24 टक्क्यांची भरघोस वाढ करण्यात आली आहे. सोमवारी केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली.
2/7

खासदारांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने 1 एप्रिल 2023 पासून ही पगारवाढ दिली जाणार आहे. त्यामुळे संसदेच्या सदस्यांना आता प्रत्येक महिन्याला 1 लाखाऐवजी 1 लाख 24 हजार रुपये वेतन मिळेल.
3/7

खासदारांचा दैनंदिन भत्ता दोन हजारावरुन अडीच हजार रुपये करण्यात आला आहे.
4/7

माजी खासदारांचे निवृत्ती वेतन दरमहा 25 हजारावरुन 31 हजार रुपये करण्यात आले आहे.
5/7

पाच वर्षांपेक्षा जास्त काळ संसदेचे सदस्य राहिलेल्या माजी खासदारांना त्यानंतरच्या प्रत्येक वर्षासाठी अतिरिक्त मासिक निवृत्तीवेतन 2 हजारावरुन 2500 करण्यात आले आहे.
6/7

यापूर्वी 2018 साली खासदारांच्या पगारात वाढ करण्यात आली होती.
7/7

खासदारांच्या भत्त्यामध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे. खासदारांना मतदारसंघातील खर्चासाठी प्रत्येक महिन्याला 70 हजार, कार्यालयीन भत्ता 60 हजार तसेच संसदेच्या अधिवेशनाच्या काळात दैनंदिन भत्ता 2000 रुपये दिला जातो. या भत्त्यामध्ये वाढ केली जाणार आहे. याशिवाय, खासदारांना दिल्लीत सरकारी निवासस्थान दिले जाते. या घरात 50 हजार युनिट वीज व 4 हजार लीटर पाणी मोफत दिले जाते.
Published at : 25 Mar 2025 08:43 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























