एक्स्प्लोर

CM Ladki Bahin Scheme: ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: 15 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयांची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होईल. या पैशांमुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठी मदत होऊ शकते. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरण्याची शक्यता

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घोषणा केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojna) माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. 

सुरुवातीला या योजनेच्या पात्रतेचे नेमके निकष काय यावरुन बराच गोंधळ उडाला होता. आता कुठे याबाबत स्पष्टता आल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार, याचे वेध लागले आहेत. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. परंतु, अजूनही अर्ज भरण्याचीच प्रक्रिया सुरु असल्याने योजनेचे पैसे कधी मिळणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलै होती. मात्र, अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारने (Maharashtra Government) या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत, त्यावरुन 16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तर 1 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. साधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होईल.

अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे 

आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र

योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. नारीशक्ती अॅपवरही अर्ज भरता येईल. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

आणखी वाचा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचे तीनतेरा वाजणार? तहसीलदार संघटनेकडून काम नाकारण्याचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 21 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Marathi Sahitya Sammelan : RSS मुळे माझा मराठीशी संबंध,पवारांसमोर UNCUT भाषणSharad Pawar Speech Marathi Sahitya Sammelan Delhi : आखिल भारतीय साहित्य संमेलनात शरद पवारांचे भाषणDr.Tara Bhawalkar speech Delhi:कोण पुरोगामी, कोण फुरोगामी, मोदी-पवारांसमोर तारा भवाळकरांनी सुनावलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Vidarbha vs Kerala Final 2025 : रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
Embed widget