Astrology : आज धन योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मिथुनसह 'या' 5 राशींना शनिदेव देणार कर्माचं फळ, चौफेर मिळणार धनलाभ
Astrology Panchang Yog 22 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 22 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 22 मार्च म्हणजेच शनिवारचा वार आहे. आज चैत्र कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी आहे त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्राचा धनु राशीत प्रवेश होणार आहे त्यामुळे धनयोगाचा संयोग (Yog) जुळून येणार आहे. आजच्या दिवशी शुभ राशींसाठी नशिबाचे दार खुले होणार, उत्पन्नाचे नवे मार्ग मिळणार त्यामुळे आजचा दिवस फार खास आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या फार सक्षमतेचा असणार आहे. तुम्हाला बिझनेसमध्ये अनेक नवीन योजनांचा लाभ घेता येईल. तसेच, प्रॉपर्टीमध्ये तु्म्ही चांगली गुंतवणूक करु शकता. नोकरदार वर्गातील लोकांसाठी ही स्थिती पार चांगली असणार आहे. या काळात तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमच्या घरात पाहुण्यांचं आगमन होण्याची शक्यता आहे. तसेच, व्यवसायात तुमची चांगली प्रगती पाहायला मिळेल. आज तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, कोणाला पैसे देताना जरा जपून करा. कारण तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुम्हाला सुख-सुविधांचा लाभ घेता येईल. तसेच, प्रॉपर्टीशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय तुम्ही घ्याल. नातेवाईक किंवा मित्रांच्या साहाय्याने तुमची अनेक कामे आज पूर्ण करता येतील. तसेच, हा काळ तुमच्यासाठी चांगला असमार आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्ही नवीन योजनांवर कामा करु शकता. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. भविष्यात तुम्ही चांगली गुंतवणूक करु शकाल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी नवीन योजनांचा वापर करु शकता. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, भावा-बहिणीतील संबंध आज फार चांगले राहतील. तुमच्या कुटुंबात आज आनंदी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Horoscope Today 22 March 2025 : आज 'या' 5 राशींवर असणार शनिदेवाची कृपा; मनातील इच्छा होतील पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

