एक्स्प्लोर

Morning Headlines 15th June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

1. Cyclone Biparjoy :  बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार, 74000 नागरिकांचं स्थलांतर; NDRFची 33 पथकं तैनात

Cyclone Biparjoy News: अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone biparjoy) गुजरातच्या (Gujarat) दिशेनं सरकत आहे. बिपरजॉय चक्रीवादळानं रौद्र रुप धारण केलं आहे. हे वादळ आज गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारनं योग्य ती खबरदारी घेतली आहे. किनारी भागातील लोकांना सुरक्षीतस्थळी हलवण्याचे काम सुरु करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत 74000 नागरिकांना सरक्षीतस्थळी हलवण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. खबरदारी म्हणून NDRFची 33 पथके तैनात करण्यात आली आहेत. वाचा सविस्तर 

2. तामिळनाडूमध्ये परवानगीशिवाय CBI तपास करू शकणार नाही; स्टॅलिन सरकारचा मोठा निर्णय

ED Arrested DMK Minister: तामिळनाडूचे (Tamil Nadu) मंत्री व्ही. सेंथिल बालाजी (V. Senthil Balaji) यांच्यावर ईडीनं (ED) छापे टाकल्यानंतर स्टॅलिन सरकारनं (Stalin Government) मोठं पाऊल उचललं आहे. राज्यात कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयला (CBI) दिलेली संमती काढून घेण्यात आली आहे. तामिळनाडू सरकारच्या (Tamil Nadu Government) निर्णयानुसार, आता केंद्रीय यंत्रणांना राज्यात कोणत्याही प्रकरण्याचा तपास करायचा असेल तर, सर्वात आधी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तामिळनाडूच्या गृहविभागानं जारी केलेल्या निवेदनानुसार, तामिळनाडू सरकारनं केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ला दिलेली सर्वसाधारण संमती मागे घेतली आहे. वाचा सविस्तर 

3. Agriculture News : महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणात चांगला दर, हमीभाव कायद्यामुळं शेतकऱ्यांना फायदा : नागेश गोडाम 

Agriculture News : सध्या महाराष्ट्रातील (Maharashtra) कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मात्र, महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणामध्ये चांगला दर मिळत आहे. तेलंगणा सरकारच्या हमीभाव योजनेमुळे महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणात चांगला दर मिळत असल्याची प्रतिक्रिया तेलंगणाचे  माजी आदीवासी मंत्री नागेश गोडाम ( Nagesh Godam) यांनी दिली. वाचा सविस्तर 

4. 30 मिनिटांच्या आगीमुळे 90 मिनिटं कोलकाता विमानतळाची वाहतूक ठप्प; सुदैवानं जीवितहानी टळली

Kolkata Airport Fire Update: कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाला बुधवारी (14 जून) रात्री आग लागल्याची बातमी समोर आली. मात्र, आता आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलानं शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आणि सर्व प्रवाशांना टर्मिनलच्या आतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. वाचा सविस्तर 

5. आधी कोंबडी की, अंड? ज्या प्रश्नानं लहानपणापासून गोंधळवलं, त्याचं अखेर शास्त्रज्ञांनी उत्तर शोधलं

An Egg Came First or Chicken: उत्तर सापडलं... कोंबडी की, अंड? पृथ्वीवर सर्वात आधी कोण आलं? लहानपणापासून ज्या कोड्यानं आपल्या सर्वांना हैराण केलं, त्याचं उत्तर अखेर शास्त्रज्ञांनी शोधलं. वाचा सविस्तर 

6. Global Wind Day 2023 : जागतिक पवन दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Global Wind Day 2023 : आज जागतिक पवन दिन. पवन ऊर्जा आणि त्याच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 जून रोजी जागतिक पवन दिन (Global Wind Day 2023) साजरा केला जातो. पवन दिन पाळण्याची सुरुवात 2007 पासून झाली. 2009 साली त्याचे नामकरण जागतिक पवन दिन असे झाले. विंडयुरोप आणि जागतिक पवन ऊर्जा परिषदे (GWEC) द्वारा हा दिवस पाळला जातो. वाचा सविस्तर 

7. 15th June In History : भारताच्या फाळणीची योजना स्वीकारली, भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण; आज इतिहासात

नवी दिल्ली : देशाची फाळणी ही भारताच्या इतिहासातील सर्वात दुःखद घटना समजली जाते. देशाला स्वातंत्र्य मिळताना भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले. हे फक्त दोन देशांचे विभाजन नव्हते तर घर, कुटुंब, नातेसंबंध आणि भावनांचे विभाजन होते. लोकांचे नशीब एका रात्रीत बदलले, लाखो लोक बेघर झाली तर काही द्वेषाच्या तलवारीच्या सपासप वाराने संपले. कुणाचे भाऊ-बहीण सीमा ओलांडून गेले तर कुणी कुटुंब, मालमत्ता इथेच सोडून पाकिस्तानला गेले. बंधूभावाने राहणारे दोन धर्माचे लोक अचानक एकमेकांचे शत्रू झाले. या फाळणीने दोन्ही समाजाच्या लोकांच्या हृदयात द्वेषाची अशी काही दरी खणून काढली, जी आजपर्यंत भरुन निघू शकली नाही. फाळणीच्या त्या दुःखद इतिहासात 15 जूनचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण राष्ट्रीय काँग्रेसने 1947 मध्ये नवी दिल्ली येथे 14-15 जून रोजी झालेल्या अधिवेशनात फाळणीचा ठराव मंजूर केला होता. स्वातंत्र्याच्या नावाखाली इंग्रजांनी भारताला कधीही भरून न येणारी ही जखम दिली. वाचा सविस्तर 

8. Horoscope Today 15 June 2023 : सिंह, तूळ, धनु, कुंभ राशीच्या लोकांनी आज 'या' चुका करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 15 June 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मिथुन राशीचे लोक आज बाहेर जाण्याचा बेत आखतील. कुंभ राशीच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. मेष ते मीन राशीसाठी आजचा गुरुवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी, त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक; म्हणाल्या, चुकीचा पायंडा पाडू नका!
प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी, त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक; म्हणाल्या, चुकीचा पायंडा पाडू नका!
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Champions Trophy 2025 : भारताविरुद्ध पराभव, चॅम्पियन्स ट्रॉफीत निराशाजनक कामगिरी, पाकिस्तानच्या महत्त्वाच्या व्यक्तीची हकालपट्टी करणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दोन पराभव, पाकिस्तानच्या जिव्हारी, स्पर्धेतून बाहेर होताच प्रमुख व्यक्तीची हकालपट्टी
Prajakta Mali Mahashivratra Program:  त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vaibhavi Deshmukh On Hunger Strike : वडिलांनी सहन केलेल्या वेदना खूप होत्या, हे आंदोलन काहीच नाहीABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 25 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सDhananjay Deshmukh On Santosh Deshmukh : कृष्णा आंधळेला अटक करा; धनंजय देशमुख आक्रमकABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 25 February 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी, त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक; म्हणाल्या, चुकीचा पायंडा पाडू नका!
प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी, त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक; म्हणाल्या, चुकीचा पायंडा पाडू नका!
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Champions Trophy 2025 : भारताविरुद्ध पराभव, चॅम्पियन्स ट्रॉफीत निराशाजनक कामगिरी, पाकिस्तानच्या महत्त्वाच्या व्यक्तीची हकालपट्टी करणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दोन पराभव, पाकिस्तानच्या जिव्हारी, स्पर्धेतून बाहेर होताच प्रमुख व्यक्तीची हकालपट्टी
Prajakta Mali Mahashivratra Program:  त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1500 रुपये आजपासून मिळणार, महिला व बाल विकास विभागानं उशीर होण्याचं कारण सांगितलं...
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे आज येणार, तुमचं बँक अकाऊंट फटाफट चेक करा
Neelam Gorhe: एकीकडे ठाकरे गटातील नेते तुटून पडले दुसरीकडे शिंदे गटातील नेतेही नीलम गोऱ्हेंवर नाराज,  म्हणाले...
विनाकारण पक्ष डॅमेज झाला! शिंदे गटातील नेते नीलम गोऱ्हेंवर नाराज, एकनाथ शिंदेंकडे महत्त्वाची मागणी
NSE Nifty 50 : निफ्टी 50 कमबॅक करणार, 26000 चा टप्पा ओलांडणार,नुकसानाच्या वणव्यात होरपळणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आशेचा किरण
निफ्टी 50 कमबॅक करणार, 26 हजारांचा टप्पा ओलांडणार, गुंतवणूकदारांसाठी 'या' फर्मनं दिली गुड न्यूज
Thane Crime: ठाण्यात गतीमंद मुलीला वेदना असह्य, आई अन् आजीने गुंगीच्या गोळ्या देऊन मारुन टाकलं, साताऱ्यातील गावी नेऊन अंत्यसंस्कार उरकले
गतिमंद मुलीच्या वेदना पाहावल्या नाहीत, आई -आजीने झोपेच्या गोळ्या देऊन कायमचं 'शांत' केलं; ठाण्यातील घटना
Embed widget