"क्लायमॅक्स... फक्त एक दृश्य नव्हतं, तो साक्षात्काराचा क्षण होता"; शंभूराजांचा सच्चा सहकारी साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्यानं सांगितल्या 'त्या' आठवणी
Marathi Actor Share Emotional Experience Of Chhaava: 'छावा' चित्रपटात अनेक मराठमोळ्या कलाकारांनी विक्कीला साथ दिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जवळचे सहकारी असणाऱ्या अंताजी यांची भूमिका अभिनेता आशिष पाथोडे यानं साकारली आहे.

Chhaava Fame Marathi Actor Share Emotional Experience: विक्की कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), अक्षय खन्ना (Akshaye Khanna) स्टारर 'छावा' (Chhaava) चित्रपट सध्या जगभरात गाजत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) थोरले चिरंजीव छत्रपती संभाजी माहाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या या चित्रपटाची चर्चा चोहीकडे सुरू आहे. या चित्रपटात विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकला आहे. विक्कीच्या अभिनयाचं साऱ्यांकडूनच कौतुक होत आहे. अशातच या चित्रपटात अनेक मराठमोळ्या कलाकारांनी विक्कीला साथ दिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जवळचे सहकारी असणाऱ्या अंताजी यांची भूमिका अभिनेता आशिष पाथोडे यानं साकारली आहे. यापूर्वी विक्की कौशल स्टारर 'सॅम बहादूर' चित्रपटातही आशिष पाथोडेनं परफॉर्मन्स कोचची भूमिका साकारली होती. नुकत्याच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना 'छावा' चित्रपटाच्या अनेक आठवणी आशिष पाथोडेनं शेअर केल्या आहेत.
आशिष पाथोडेनं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना भावनिक आणि धाडसी कथेवर काम करण्याचा अनुभव, विक्की कौशलसोबत काम करण्याचा अनुभव आणि चित्रपटाच्या क्लायमॅक्सबाबत भाष्य केलं आहे.
'छावा' चित्रपटाबाबत बोलताना आशिष पाथोडे म्हणाला की, "हा भावनिकदृष्ट्या एक सखोल प्रवास होता... कला दिग्दर्शक आणि निर्मिती डिझायनर हे दूरदर्शी होते ज्यांनी तो काळ प्रामाणिकपणे पुन्हा एकदा उभा करण्यासाठी व्यापक संशोधन केलं... राजघराण्यातील व्यक्तींनी परिधान केलेल्या दागिन्यांपासून ते तलवारींवरील डिझाइनपर्यंत, प्रत्येक तपशील काळजीपूर्वक तयार केला गेला होता. राज्याभिषेक सीक्वेन्सचे चित्रीकरण करतानाही, भावना खऱ्या वाटल्या..."
View this post on Instagram
"सिनेमासाठी घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे चार महिन्यांचे प्रशिक्षण घेतलं. बॉडी डबल न वापरता 'छावा' मधील कलाकारांनी त्यांचे स्वतःचे अॅक्शन सीक्वेन्स सादर केले आणि त्यामुळे त्यातील खरेपणा दिसून आला. घोडेस्वारीपासून सर्व दृश्य कलाकारांनी सादर केलीत..", असं आशिषनं बोलताना सांगितलं.
ते आमच्यासाठी फक्त एक दृश्य नव्हतं, तो साक्षात्काराचा क्षण होता... : आशिष पातोडे
आशिष पाथोडे पुढे बोलताना म्हणाला की, "चित्रपटात आपण विजयाचे चित्रण करतो, पण त्यामागे प्रचंड संघर्ष आहे. अंताजी, रायाजी आणि महाराज यांच्यातील नातं अत्यंत खोल होतं, ते फक्त योद्धे नव्हते, ते महाराजांची सावली होते, त्यांचे विश्वासू होते. क्लायमॅक्स शूट करताना, संभाजी महाराजांनी वास्तविक जीवनात जे सहन केलं, त्याचं गांभीर्य आम्हाला जाणवलं. ते आमच्यासाठी फक्त एक दृश्य नव्हतं, तो साक्षात्काराचा क्षण होता..."
"ज्यावेळी अनेक मराठा सैनिक मृत्युमुखी पडले ती गुदमरणारी परिस्थिती आम्हाला पुन्हा एकदा उभी करावी लागली. आपली संख्या कमी आहे हे माहीत असूनही त्यांनी दाखवलेली दृढता हृदयद्रावक होती. ती तीव्रता पडद्यावर दिसून आली..", असंही आशिष पातोडेनं सांगितलं.
विक्की अत्यंत नम्र आणि दृढनिश्चयी : आशिष पातोडे
"विक्की अत्यंत नम्र आणि दृढनिश्चयी आहे. तो इतका 'देसी' आहे आणि आपल्यातलाच वाटतो, याचे कारण तोही एका सामान्य कुटुंबातून येतो. त्याने एक सामान्य जीवन पाहिले आहे आणि त्यातून तो बाहेर आला आहे. म्हणूनच, सर्व प्रसिद्धी असूनही, त्याच्यावर याचा प्रभाव पडत नाही... पात्रासाठी स्वत:ला समर्पित करण्याची त्याची क्षमता अविश्वसनीय आहे. तो नेहमीच सूचना ऐकून घेतो, तालीम करण्यास उत्सुक असतो आणि त्याच्या अभिनयात सुधारणा करण्यास तयार असतो. त्याची अनुकूलता त्याला एक अद्भुत अभिनेता बनवते", असंही तो म्हणाला.
























