एक्स्प्लोर

30 मिनिटांच्या आगीमुळे 90 मिनिटं कोलकाता विमानतळाची वाहतूक ठप्प; सुदैवानं जीवितहानी टळली

Kolkata Airport Fire Update: कोलकाता विमानतळावर आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Kolkata Airport Fire Update: कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाला बुधवारी (14 जून) रात्री आग लागली होती. मात्र, आता आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलानं शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आणि सर्व प्रवाशांना टर्मिनलच्या आतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. 

विमानतळावर लागलेल्या आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. कोलकाता विमानतळाच्या (Kolkata Airport) अधिकाऱ्यांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार, आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचं बोललं जात आहे. आगीनंतर प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण झाला होता. ही घटना सकाळी 9.12 च्या सुमारास घडल्याची माहिती कोलकाता विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवाशांना अग्निशमन दल आणि विमानतळावरी स्टाफनं सुखरूप बाहेर काढलं. 

घटनेसंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाचं वक्तव्य 

भारतीय विमानतळ प्राधिकरणानं सांगितलं की, नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल (NSCBI) विमानतळ कोलकाता चेक-इन एरिया पोर्टल डी येथे रात्री 9.12 च्या सुमारास आग लागली आणि धूर झाला. रात्री 9.40 पर्यंत आग नियंत्रणात आणण्यात आली. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून चेक-इन परिसरात धुराचे लोट आढळल्यानं प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. कामकाज आता पुन्हा सुरळीत सुरू झालं आहे. 

सीआयएसएफनं आगीसंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, डी पोर्टल चेक-इन काउंटरला आग लागली. टर्मिनल इमारतीतून धुर पसरल्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. या घटनेत कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. आग विझवण्यात आली आहे. सामान्य कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झालं आहे. 

काय म्हणाले ज्योतिरादित्य शिंदे?

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही या घटनेबाबत ट्वीट केलं आहे. "कोलकाता विमानतळावरील चेक-इन काउंटरजवळ एक दुर्दैवी पण किरकोळ आग लागली." असं ते म्हणाले. तसेच, ते विमानतळ संचालकांच्या संपर्कात असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सुदैवानं सर्वजण सुरक्षित असून कोणतीही दुखापत झालेली नाही. सकाळी 10.25 वाजता चेक-इन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. आगीचं कारण लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

UP MLC Election Result 2026: वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
Arnab Cyclone Marathi News: 100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 
भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
UP MLC Election Result 2026: वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
NCP Ajit Pawar Camp: पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली; उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली, उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
Gokul Election: गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Raj Thackeray: 'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
Embed widget