एक्स्प्लोर

Horoscope Today 15 June 2023 : सिंह, तूळ, धनु, कुंभ राशीच्या लोकांनी आज 'या' चुका करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 15 June 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 15 June 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मिथुन राशीचे लोक आज बाहेर जाण्याचा बेत आखतील. कुंभ राशीच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. मेष ते मीन राशीसाठी आजचा गुरुवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
 
मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. ओळखीतून नवीन नोकरीची ऑफरही येईल. आज घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. परिचितांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या काही संधीही मिळतील. ऑफिसमध्ये ज्या व्यक्तीशी तुमचा कमीत कमी संबंध असतो त्याच्याशी तुमचा चांगला संवाद होऊ शकतो. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदाराबरोबर आज एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. जे लोक घरबसल्या ऑनलाईन काम करतायत त्यांना खूप फायदा होणार आहे. तुमच्या गोड बोलण्याने तुम्हाला फायदा होईल. नोकरीच्या शोधात जे तरूण फिरत आहेत त्यांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमचे थांबलेले पैसे परत मिळतील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मोकळ्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे, पण तुम्ही या वेळेचा दुरुपयोग कराल आणि त्यामुळे तुमचा मूड खराब होईल. कुटुंबासाठी एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलाल. आजूबाजूच्या लोकांचे सहकार्य तुम्हाला सुखद अनुभूती देईल. मालमत्तेशी संबंधित व्यवहार पूर्ण होतील आणि फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांना प्राधान्य द्या. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी व्हा. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

मिथुन

मिथुन  राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही क्षेत्रात केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. वरिष्ठांकडून चांगली बातमी मिळेल. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद राहील.जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. तुमचा उदार स्वभाव उद्या तुमच्यासाठी अनेक आनंदाचे क्षण घेऊन येईल. जर तुमच्या पैशांशी संबंधित कोणतेही प्रकरण कोर्टात अडकले असेल तर आज तुम्हाला त्यात विजय मिळू शकतो आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या आकर्षण आणि व्यक्तिमत्वामुळे तुम्हाला काही नवीन मित्र भेटतील. तुमच्या कार्यक्षेत्रातही तुम्हाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुटुंबाच्या भल्यासाठी काम करताना दिसाल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. नेत्यांना भेटण्याची संधीही मिळेल. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, पण वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही काम पूर्ण करू शकाल. मोकळ्या वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील. तुमचे लक्ष इकडे तिकडे वळवणाऱ्या तुमच्या मित्रांपासून दूर राहा. 

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण कराल. तुम्हाला तुमची कोणतीही मालमत्ता विकायची असेल तर तीही उद्या चांगल्या भावात विकता येईल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. वरिष्ठांकडून केलेल्या कामाचे कौतुक ऐकायला मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काम करताना दिसतील. वरिष्ठ सदस्यांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे.  मुलांकडून मान-सन्मान वाढेल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. 

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत मिळतील. नफा कमावू शकाल. वरिष्ठ सदस्यांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत संध्याकाळी फिरायला जा, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. कुटुंबीयांबरोबर मिळून एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखा. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. एखाद्या नातेवाईकांच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते वेळेवर परत करा. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुमच्या मोकळ्या वेळेचा योग्य वापर करा. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. नवीन करार उपलब्ध होतील. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या, जे आध्यात्मिक जीवनासाठी आवश्यक आहे. आज तुमची आर्थिक बाजू चांगली असेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. सरकारी क्षेत्रांतून लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही सर्व कामे पूर्ण करू शकाल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. घरात शुभ कार्याचे आयोजन करण्यात येईल. जे बेरोजगार आहेत त्यांना चांगला रोजगार मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांबरोबर धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा. आरोग्याची काळजी घ्या. ज्यांनी पूर्वी आपले पैसे गुंतवले होते, त्यांना आज त्या पैशातून फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आणि चांगले काम करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील. तुमच्या गोड बोलण्यातून फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकार्‍यांकडून आनंदाची बातमी मिळेल. नोकरीत जागा बदलण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना सुरू करण्यात यशस्वी होतील. तुमच्या वडिलांचा कोणताही सल्ला तुम्हाला  कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ देऊ शकतो. 

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्त्रोत उपलब्ध होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. विद्यार्थी मेहनतीने अभ्यास करताना दिसतील. आज तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या मुलांबरोबरही थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल. इतरांवर टीका करण्याच्या तुमच्या सवयीमुळे तुम्हालाही टीकेला सामोरे जावे लागू शकते. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. जे लोक घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण येईल. आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कामे पूर्ण होतील. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे, सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. कोणत्याही नवीन प्रकल्पावर काम करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. मोकळ्या वेळेचा योग्य वापर करायला शिका. 

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. तुम्ही मुलांबरोबर वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. पैशामुळे थांबलेली तुमची कामे पूर्ण होतील. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील, तर ते तुम्हाला आज न मागता परत मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. जुन्या गुंतवणुकीमुळे उत्पन्नात वाढ होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 14 June 2023 : वृषभ, धनु, मकर, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात

व्हिडीओ

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
Embed widget