एक्स्प्लोर
Vicky Kaushal Is Not First Choice For Chhaava: विक्की कौशलपूर्वी 'छावा' चित्रपटातील संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी 'या' अभिनेत्याला मिळाली होती ऑफर; पण त्यानं...
Vicky Kaushal Is Not First Choice For Chhaava: विक्की कौशलचा नुकताच प्रदर्शित झालेला 'छावा' हा एक ऐतिहासिक चित्रपट सध्या जगभरात गाजतोय. हा चित्रपट भारतात आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करत आहे.
Vicky Kaushal Is Not First Choice For Chhaava
1/15

'छावा' चित्रपट रिलीजच्या अकरा दिवसांतच 350 कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. दररोज बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत दिग्गजांना धूळ चारणाऱ्या 'छावा'नं अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.
2/15

'छावा' यशाची नवनवी शिखरं सर करत असतानाच, या चित्रपटाचं कास्टिंग, शुटिंग आणि इतर अनेक गोष्टींबाबत नवनवे खुलासे होत आहेत. अशा परिस्थितीत, तुम्हाला माहिती आहे का? छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणाऱ्या आणि आपल्या अभिनयानं सर्वांना मुजरा करायला भाग पाडणारा विक्की कौशल या चित्रपटासाठी पहिली पसंती कधीच नव्हता.
3/15

विक्कीच्या आधी 'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची ऑफर एका सुपरस्टारला देण्यात आली होती.
4/15

एकीकडे 'छावा' चित्रपट गाजत असतानाच दुसरीकडे त्याच्या कास्टिंगबाबत नवनवे अपडेट्स समोर येत आहेत.
5/15

असं सांगितलं जातंय की, 'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी विक्की कौशल निर्मात्यांची पहिली पसंती कधी नव्हताच मुळी.
6/15

'छावा'तील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी सर्वात आधी एका दाक्षिणात्या सुपरस्टारचा विचार करण्यात आला होता.
7/15

तेलुगू चित्रलू पोर्टलनंदिलेल्या वृत्तानुसार, संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी दाक्षिणात्या सुपरस्टार महेश बाबू निर्मात्यांची पहिली पसंती होता.
8/15

मिडिया रिपोर्ट्सनुसार, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेसाठी कतरिना कैफला संपर्क साधण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, काही कारणास्तव ती त्यात सहभागी होऊ शकली नाही.
9/15

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सुरुवातीला दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याच्याशी संपर्क साधला होता. पण, मेहश बाबूनं यामध्ये फारसा रस दाखवला नाही आणि म्हणूनच लक्ष्मण उतेकर यांनी विक्की कौशलशी संपर्क साधला आणि विक्कीनं तात्काळ आपला होकार कळवला.
10/15

विक्की कौशलनं आपल्या मेहनतीच्या आणि अभिनयाच्या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर जिवंत केली. आज अख्ख्या देश शंभू राजेंच्या रुपाय विक्की कौशलला पाहतोय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
11/15

रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत विक्की म्हणालेला की, "शारीरिकदृष्ट्या, छावा ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण भूमिका आणि याचं कारण म्हणजे, 25 किलो वजन वाढवणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. हे करण्यासाठी मला 7 महिने लागले. लक्ष्मण सरांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं की, जोपर्यंत तुला शंभू राजेंचा तो लूक मिळत नाही, तू घोडेस्वारी शिकत नाही, तलवारबाजीचं प्रशिक्षण पूर्ण करत नाहीस, तोपर्यंत मी चित्रपटाचं शुटिंग सुरू करणार नाही..."
12/15

'छावा'मध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, आशुतोष राणा, प्रदीप रावत, संतोष जुवेकर, डायना पेंटी आणि विनीत कुमार सिंह यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
13/15

'छावा' चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. आतापर्यंत 300 कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या 'छावा'ला मध्य प्रदेश आणि गोव्यातही करमुक्त घोषित करण्यात आलं आहे. 'छावा' पाहण्यासाठी अनेकजण थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.
14/15

चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर चाहते खूप भावूक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 'छावा'ची फक्त देशभरातच नाहीतर, संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे.
15/15

'छावा' चित्रपटात विक्की कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना हिनं त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना दिसून आला आहे. तर, या चित्रपटात आशुतोष राणा देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे.
Published at : 25 Feb 2025 12:38 PM (IST)
आणखी पाहा























