India Qualify For Semi-Final Champions Trophy : 6 दिवसांपूर्वीच टीम इंडिया-न्यूझीलंड संघाचे सेमीफायनलचे तिकीट पक्के! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप 'बी'मध्ये शर्यत झाली रंजक
Champions Trophy : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकापेक्षा एक रोमांचक सामने खेळवले जात आहेत.

New Zealand, India Qualify For Semi-Final Champions Trophy : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकापेक्षा एक रोमांचक सामने खेळवले जात आहेत. दरम्यान, दोन संघांनी उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचे नाव समाविष्ट आहे. टीम इंडियाला स्पर्धेतील शेवटचा ग्रुप स्टेज सामना 2 मार्च रोजी खेळायचा आहे, परंतु त्यांनी आधीच सेमीफायनलसाठी पात्रता मिळवली आहे. याचा अर्थ असा की न्यूझीलंडविरुद्धचा सामना ही टीम इंडियासाठी एक औपचारिकता आहे. या सामन्याचा निकाल उपांत्य फेरीच्या शर्यतीवर परिणाम करणार नाही.
INTO THE SEMIS 🤩
— ICC (@ICC) February 24, 2025
A third-successive final-four appearance for India at the #ChampionsTrophy 👏 pic.twitter.com/N8kR0rhRMy
टीम इंडिया-न्यूझीलंड संघाचे सेमीफायनलचे तिकीट पक्के!
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा सहावा सामना रावळपिंडी येथे न्यूझीलंड आणि बांगलादेश संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने सहज विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
न्यूझीलंड, बांगलादेश, भारत आणि पाकिस्तानचे संघ अ गटात आहेत. या गटात भारत आणि न्यूझीलंडने त्यांचे दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकले आहेत आणि दोन्ही संघांचे 4-4 गुण आहेत. अशा परिस्थितीत, आता बांगलादेश आणि पाकिस्तान 2-2 सामने गमावल्यानंतर इतके गुण मिळवू शकत नाहीत, ज्यामुळे न्यूझीलंडसह भारताला सेमीफायनलचे तिकीट मिळाले आहे.
दोन्ही संघांनी शानदार कामगिरी करत गट फेरी जिंकून पुढील फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आता सर्वांचे लक्ष उपांत्य फेरीकडे आहे, जिथे हे दोन्ही संघ त्यांचे जेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी मैदानात उतरतील.
New Zealand make it two wins in two games, and are into the #ChampionsTrophy 2025 semi-finals 🤩 pic.twitter.com/UwPpYWPfp5
— ICC (@ICC) February 24, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप 'बी'मध्ये शर्यत झाली रंजक
ग्रुप बी मधील शर्यत रोमांचक बनली आहे. या गटात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे या गटातून उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघांची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाशी सामना करेल. या सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत पोहोचणारा गट ब मधील पहिला संघ बनेल. त्याच वेळी इंग्लंड आणि अफगाणिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत, हे चारही संघ सध्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत.
हे ही वाचा -





















