आधी कोंबडी की, अंड? ज्या प्रश्नानं लहानपणापासून गोंधळवलं, त्याचं अखेर शास्त्रज्ञांनी उत्तर शोधलं
An Egg Came First or Chicken: उत्तर सापडलं... कोंबडी की, अंड? पृथ्वीवर सर्वात आधी कोण आलं? लहानपणापासून ज्या कोड्यानं आपल्या सर्वांना हैराण केलं, त्याचं उत्तर अखेर शास्त्रज्ञांनी शोधलं.
An Egg Came First or Chicken: लहानपणापासूनच आपण सर्वांनी एक प्रश्न नक्कीच ऐकला आहे. तो म्हणजे, कोंबडी आधी की, अंडी? पण तुम्हाला माहिती आहे का? आपल्या लहानपणापासून अनुत्तरित असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर आता शास्त्रज्ञांनी शोधलं आहे. तुम्हालाही याचं उत्तर ऐकायची उत्सुकता नक्कीच असेल की, या पृथ्वीवर सर्वात आधी कोण आलं? कोंबडी की, अंड?
ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या (Bristol University) शास्त्रज्ञांनी या विचित्र प्रश्नाचं उत्तर शोधून काढलं आहे. शास्त्रज्ञांनी सांगितलं की, पृथ्वीवर सर्वात आधी कोंबडी आली होती. त्यामागे जो सिद्धांत सांगण्यात आला आहे, तो अगदी वेगळा आहे. कदाचितच तुमचा यावर विश्वास बसेल. पण शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून, शास्त्रज्ञ याच निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत. काही लोकांचं कदाचित यावर समाधान होणार नाही, पण संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष वैज्ञानिक तथ्यांच्या आधारे तंतोतंत खरी ठरत आहेत.
आधी अंड की कोंबडी? काय सांगत शास्त्रज्ञांचं संशोधन
युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोंबडा-कोंबडी आता जसे आहेत. तसे आधीपासून नव्हते. ते आधी माणसाप्रमाणेच सस्तन प्राण्यांमध्ये समाविष्ठ व्हायचे. म्हणजे, कोंबडी अंडी न देता, ती आपल्या पिलांना जन्म द्यायची. अंडी तर कोट्यवधी वर्षांपूर्वी कोंबड्याचे पूर्वज डायनोसॉर देत असत, हा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी नाकारला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, कोंबड्यांचे पूर्वज मानवांप्रमाणे पिल्लांना जन्म देत असत. ब्रिस्टल युनिवर्सिटी आणि नानजिंग युनिवर्सिटीच्या संशोधकांचं असं म्हणणं आहे की, अंडी देणाऱ्या पशु-पक्षांचा विकास हा सस्तन प्राण्यांपासूनच झाला आहे. अनेक वर्षांपूर्वी अशा प्रजाती होत्या, ज्या अंडीही द्यायच्या आणि सस्तन प्राण्यांना जन्मही. त्यांच्यात दोन्ही क्षमता होत्या. म्हणजेच, या प्रजाती विकसित होण्यापूर्वीच कोंबडी आणि कोंबडा पृथ्वीवर अस्तित्वात होता.
हा तर विज्ञानाचा अविष्कार...
शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, मुलांना जन्म देण्याच्या क्षमतेमध्ये फरक असणं, हे एक्सटेंडेड एम्ब्रायो रेटेंशनमुळे होतं. पक्षी, मगरी आणि कासव अशी अंडी घालतात ज्यामध्ये गर्भाची निर्मितीच झालेली नसते, तर काही सजीव असे असतात, भ्रूण विकसित झाल्यानंतरच अंडी देतात. साप, पाल या प्रजाती अशा आहेत, ज्या अंडीही देतात आणि पिल्लांना जन्मही देऊ शकतात. कारण अंडी दिल्यानंतर ऊब देण्याची गरज नसते.