Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी तब्बल 41 हजार 134 रुग्णांची नोंद, तर 13 जणांचा मृत्यू
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.07 टक्के झाला आहे

मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 41 हजार 134 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 9 हजार 671 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
राज्यात 133 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 133 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1009 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 439 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
मागील काही दिवसातील रूग्ण संख्या
7 जानेवारी - 40, 925 रूग्ण
6 जानेवारी - 36,265 रूग्ण
5 जानेवारी - 26, 538 रूग्ण
4 जानेवारी - 18, 466 रूग्ण
3 जानेवारी - 12, 160 रूग्ण
2 जानेवारी - 11, 877 रूग्ण
1 जानेवारी - 9,170 रूग्ण
31 डिसेंबर - 8067 रूग्ण
राज्यात आज 13 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.07 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 73 हजार 238 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 57 हजार 81 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.37 टक्के आहे. सध्या राज्यात 8 लाख 45 हजार 089 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1851 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7, 03 , 42, 173 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
Mumbai Corona Update : मुंबईत आजही 20 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद
शनिवारी मुंबईत 20 हजार 318 इतक्या नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. सहा हजार रुग्णांनी कोरोनावर मात केलाय. तर पाच जणांचा मृत्यू झालाय. आज 1,257 रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. तर आज आढळलेल्या रुग्णापैकी 16,661 इतक्या जणांना कोणतीही लक्षणे नाहीत. सर्वांवर घरीच उपचार सुरु आहेत. मुंबईतील रिकव्हरी रेट 86 टक्केंवर गेलाय. तर मुंबईचा डबलिंग रेट 47 दिवसांवर आलाय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
