एक्स्प्लोर

Mumbai Corona Update : मुंबईत आजही 20 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद

Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने (Corona) हाहाकार माजवला आहे. आठ दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णाचा आलेख चढताच राहिलाय.

Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने (Corona) हाहाकार माजवला आहे. आठ दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णाचा आलेख चढताच राहिलाय. मुंबईसह राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत आज (शनिवारी) पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या 20 हजारांपेक्षा जास्त आढळली आहे.  दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे बीएमसी प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पण दररोज हजारोंच्या तुलनेत वाढणारी रुग्णसंख्या आता 20 हजारांच्या पुढे गेली आहे.  

बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी मुंबईत 20 हजार 318 इतक्या नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. सहा हजार रुग्णांनी कोरोनावर मात केलाय. तर पाच जणांचा मृत्यू झालाय. आज 1,257 रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. तर आज आढळलेल्या रुग्णापैकी 16,661 इतक्या जणांना कोणतीही लक्षणे नाहीत. सर्वांवर घरीच उपचार सुरु आहेत. मुंबईतील रिकव्हरी रेट 86 टक्केंवर गेलाय. तर मुंबईचा डबलिंग रेट 47 दिवसांवर आलाय. 

मुंबईतील रुग्णसंख्येची आकडेवारी 

तारीख मुंबईतील रुग्णसंख्या
21 डिसेंबर 327
22 डिसेंबर 490
23 डिसेंबर 602
24 डिसेंबर 683
25 डिसेंबर 757
26 डिसेंबर 922
27 डिसेंबर 809
28 डिसेंबर 1377
29 डिसेंबर 2510
30 डिसेंबर 3671
1 जानेवारी 6347
2 जानेवारी 8063
3 जानेवारी 8082
4 जानेवारी 10860
5 जानेवारी 15166
6 जानेवारी 20181
7 जानेवारी 20971

मुंबईकरांची चिंता वाढतेय, पण घाबरून जाण्याचे कारण नाही ; BMC महापौर किशोरी पेडणेकर 
"मुंबईत कोरोना रूग्ण वाढत आहेत. परंतु, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, कोरोना विरोधातील लढाईसाठी पालिकेची पूर्ण तयारी  झाली आहे. पालिका रूग्णालयांमध्ये अडीच  हजार बेड उपलब्ध आहेत. बीकेसीत आतापर्यंत एकही आयसीयूतील रूग्ण नाही. 20 हजार पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 17 हजार लक्षणे नसलेले रूग्ण आहेत. कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे," अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी यावेळी दिली. 

मुंबई पोलिसांना कोरोनाचा विळखा 
निवासी डॉक्टरानंतर  आता पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आज (शुक्रवारी) मुंबईत तब्बल 93 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची  झाली आहे. कोरोनाच्या वाढता धोक्यामुळे पोलिसांनाही संकटाचा सामना करावा लागतोय. जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र पोलिसांना 24 तास रात्रंदिवस कामावर रुजू व्हावे लागत आहे. आतापर्यंत   9 हजार 657 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.  कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे धोका पत्करून पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget