एक्स्प्लोर

तीन बोट उलटल्या, डोंबिवलीत आगडोंब, आठवडाभरात 40 जण दगावले, राज्यातील 10 मन हेलावून टाकणाऱ्या दुर्घटना!

Maharashtra News : महाराष्ट्रात या आठवड्यात 10 दुर्घटना घडल्या. यात 40 निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे. 29 जणांचा बुडून मृत्यू झाला तर डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटामुळे 11 जणांचा मृत्यू झाला.

मुंबई : महाराष्ट्रात या आठवड्यात 10 दुर्घटना घडल्या असून यात 40 निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील 29 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटामुळे (Dombivli MIDC Blast) आतापर्यंत 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनांमुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. पाहूयात या आठवडाभरातील महाराष्ट्रातील 10 मन हेलावून टाकणाऱ्या घटना...

1. डोंबिवली एमआयडीसीत आगडोंब, 11 कामगारांचा मृत्यू

डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत गुरुवारी भला मोठा स्फोट झाला. त्यानंतर अनेक छोटे स्फोट झाले. या घटनेत आतापर्यंत 11 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 60 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या भीषण स्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमआयडीसीतील धोकादायक केमिकल कंपनींना डोंबिवलीच्या हद्दीतून बाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

2. सिंधुदुर्गात बोट उलटली, दोघांचा मृत्यू

सिंधुदुर्गातील वेंगुर्ले बंदरात (Sindhudurga  Boat Accident) मच्छिमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन बोट जात असताना ती अचानक उलटली. या बोटीमध्ये एकूण सात खलाशी होते. बोट उलटल्यानंतर तीन जणांनी पोहून किनारा गाठला. तर चार जण बेपत्ता होते, त्यातील दोघांचे मृतदेह सापडले आहेत. दोन जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. 

3. उजनी बोट दुर्घटनेत सहा जणांना जलसमाधी

21 मे रोजी  इंदापूर तालुक्यातील (Indapur Taluka) डोंगरे व जाधव कुटुंब अजोती येथे पाहुण्याच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला निघाले होते. प्रवासी कुगावकडून कळाशीच्या दिशेने जाणाऱ्या बोतेने प्रवास करत होते. अचानक हलका पाऊस आणि जोरदार वारा सुटला. त्यामुळं रौद्ररुप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले आणि बोट जागेवर फिरली. यामध्ये सहा प्रवाशी बुडाले होते. त्यानंतर तब्बल 40 तास शोधमोहीम राबवण्यात आली. या घटनेत सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला. गोकूळ दत्तात्रय जाधव (30), कोमल गोकूळ जाधव (25), शुभम गोकूळ जाधव (दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (3), अनुराग अवघडे (35), गौरव डोंगरे (16) अशी मृतांची नावे आहेत.

4. प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटली, सहा जणांचा मृत्यू

प्रवरा नदीत (Pravara River) दोन तरुण पोहण्यासाठी आले असता दोघेही पाण्यात बुडाले. यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याला शोधण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र एसडीआरएफची बोट शोधकार्य सुरु असताना अचानक उलटली. या बोटीत पथकातील पाच जणांसह एक स्थानिक नागरिक बुडाला होता. या घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सागर पोपट जेडगुले (25) व अर्जुन रामदास जेडगुले (18) हे दोघे नदीत पोहण्यासाठी आले होते. दोघांचे मृतदेह सापडले आहे. धुळे एसडीआरएफ बलगट क्रमांक 6 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पोलीस शिपाई वैभव वाघ व पोलीस शिपाई राहुल पावरा, आणि स्थानिक नागरिक गणेश मधुकर देशमुख (वाकचौरे), अशा एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार, कॉन्स्टेबल अशोक हिंमतराव पवार यांना बाहेर काढण्यात यश आले होते. दोघांवर सध्या उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे. 

5. भावली धरणात पाच जणांचा बुडून मृत्यू

नाशिकच्या  इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) भावली धरण (Bhavali Dam) परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या पाच जणांचा धरणात बुडून (Drown) मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली. मृतांमध्ये तीन मुलींसह दोन तरुणाचा समावेश आहे. हे सर्वजण नाशिकरोड (Nashikroad) येथील गोसावीवाडीतील रहिवासी आहेत. या घटनेमुळे गोसावीवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. हनिफ शेख, अनस खान दिलदार खान (15), नाझिया इमरान खान (15), मीजबाह दिलदार खान (16) आणि ईकरा दिलदार खान (14) अशी मृतांची नावे आहेत. 

6. बीड जिल्ह्यात दोन मुलांसह महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू

केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनपुर (ता.अंबाजोगाई) येथील महिलेचा दोन मुलांसह विहिरीत बुडून मृत्यू झाला. द्रौपदी संतोष गोईनवाड, पूजा (7), सुदर्शन (7) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

7. मुंढेगावला विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू

मुंढेगाव (Mundhegaon) येथील जिंदाल कंपनीजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील एका विहिरीत विवाहित महिलेसह मुलीचा मृतदेह आढळून आला. प्रियंका नवनाथ दराणे (23) आणि वेदश्री नवनाथ दराणे (03) असे मृत्यू झालेल्या मायलेकींचे नाव आहे. विहिरीला कठडा नसल्यामुळे विहिरीजवळ गेलेली बालिका विहिरीत पडली. बालिकेला वाचवण्यासाठी आईने धाव घेऊन उडी मारली असावी, असा शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

8. सिन्नरमध्ये बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू 

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात कुंदेवाडी (Kundewadi) या ठिकाणी देव नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी (दि. 23) दुपारी तीन वाजेच्या सुमारास आंबेडकरनगर वावी या ठिकाणी राहणारे दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू झाला. हे दोघेही सोळा वर्षीय तरुण असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.    

9. नागपूरमध्ये तलावात बुडून तरुणाचा मृत्यू  

नागपूर येथील वाठोडा परिसरातील काही मित्र फिरायला आले होते. तलावात पोहायला गेलेल्या विनीत राजेश मनघटे (18) या तरुणाचा मृत्यू झाला. आज गुरुवारी सकाळी 10 वाजता ही घटना घडली. गावातील पोहणाऱ्या तरुणांनी मृतदेह बाहेर काढला.  

10. पुण्यात दोन सख्या भावंडांचा बुडून मृत्यू

पुणे जिल्ह्यातील पाबळ येथे आजोबांसोबत शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोघांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आर्यन नवले  आणि आयुष नवले, अशी साधारण तेरा वर्षीय बुडालेल्या मुलांची नावं आहेत. एकाच वेळी दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने नवले कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे. यामुळे पाबळ गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य सरकारच्या बहुउद्देशीय ठाणे-बोरीवली बोगदा प्रकल्पात घोटाळा? आरबीआयची मान्यता नसलेल्या परदेशी बँकेची बँक गँरेटी कशी? हायकोर्टात याचिका दाखल
राज्य सरकारच्या बहुउद्देशीय ठाणे-बोरीवली बोगदा प्रकल्पात घोटाळा? आरबीआयची मान्यता नसलेल्या परदेशी बँकेची बँक गँरेटी कशी? हायकोर्टात याचिका दाखल
Mrs Movie: बॉलिवूडमध्ये साऊथच्या मूव्हीचा रिमेक, OTT वर सर्वांना करतोय बेहाल; तुम्ही पाहिलाय?
बॉलिवूडमध्ये साऊथच्या मूव्हीचा रिमेक, OTT वर सर्वांना करतोय बेहाल; तुम्ही पाहिलाय?
Wardha Crime : तोंडाने नळीवाटे शरीरातून अशुद्ध रक्त काढलं, प्रत्येक घोटाला अडीच हजारांचा खर्च, असं फुटलं भोंदू टोळीचं बिंग, वर्ध्यात अघोरी प्रकाराने खळबळ
तोंडाने नळीवाटे शरीरातून अशुद्ध रक्त काढलं, प्रत्येक घोटाला अडीच हजारांचा खर्च, असं फुटलं भोंदू टोळीचं बिंग, वर्ध्यात अघोरी प्रकाराने खळबळ
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: अपात्र लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांवर, 1500 रुपये बंद होणार, दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार
मोठी बातमी, अपात्र लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांवर, दरमहा मिळणारे 1500 रुपये बंद होणार, सरकारचे 945 कोटी वाचणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : कोणत्याही गोष्टीला लिमीट असते...धनंजय मुंडेंबाबत गोगावलेचं मोठं वक्तव्यEknath Shinde Vs Sanjay Raut : कोण ज्युनियर, कोण सिनियर? राऊतांच्या विधानावर शिंदे काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 20 February 2025Shiv Jayanti 2025 : शोभायात्रा, ढोल पथकं, पोवाडे; राज्यभरात शिवजयंतीचा जल्लोष  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य सरकारच्या बहुउद्देशीय ठाणे-बोरीवली बोगदा प्रकल्पात घोटाळा? आरबीआयची मान्यता नसलेल्या परदेशी बँकेची बँक गँरेटी कशी? हायकोर्टात याचिका दाखल
राज्य सरकारच्या बहुउद्देशीय ठाणे-बोरीवली बोगदा प्रकल्पात घोटाळा? आरबीआयची मान्यता नसलेल्या परदेशी बँकेची बँक गँरेटी कशी? हायकोर्टात याचिका दाखल
Mrs Movie: बॉलिवूडमध्ये साऊथच्या मूव्हीचा रिमेक, OTT वर सर्वांना करतोय बेहाल; तुम्ही पाहिलाय?
बॉलिवूडमध्ये साऊथच्या मूव्हीचा रिमेक, OTT वर सर्वांना करतोय बेहाल; तुम्ही पाहिलाय?
Wardha Crime : तोंडाने नळीवाटे शरीरातून अशुद्ध रक्त काढलं, प्रत्येक घोटाला अडीच हजारांचा खर्च, असं फुटलं भोंदू टोळीचं बिंग, वर्ध्यात अघोरी प्रकाराने खळबळ
तोंडाने नळीवाटे शरीरातून अशुद्ध रक्त काढलं, प्रत्येक घोटाला अडीच हजारांचा खर्च, असं फुटलं भोंदू टोळीचं बिंग, वर्ध्यात अघोरी प्रकाराने खळबळ
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: अपात्र लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांवर, 1500 रुपये बंद होणार, दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार
मोठी बातमी, अपात्र लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांवर, दरमहा मिळणारे 1500 रुपये बंद होणार, सरकारचे 945 कोटी वाचणार
Digital India Bill : केंद्र सरकार आयटी कायद्याच्या जागी डिजिटल इंडिया विधेयक आणणार, यूट्यूबर्स, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया यूझर्स सुद्धा कायद्याच्या कक्षेत!
केंद्र सरकार आयटी कायद्याच्या जागी डिजिटल इंडिया विधेयक आणणार, यूट्यूबर्स, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया यूझर्स सुद्धा कायद्याच्या कक्षेत!
Chhaava Box Office Collection Day 6: चोहीकडे फक्त 'छावा'चीच हव्वा; सहाव्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ठरला तिसरा चित्रपट, 200 कोटींपासून इंचभर दूर
एक ही शंभू राजा था... सहाव्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट 'छावा', 200 कोटींपासून इंचभर दूर
Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी झीशान अख्तर परदेशात फरार; पाकिस्तानी माफिया डॉनचं नाव घेत व्हिडिओ रिलीज करत काय म्हणाला?
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी झीशान अख्तर परदेशात फरार; पाकिस्तानी माफिया डॉनचं नाव घेत व्हिडिओ रिलीज करत काय म्हणाला?
Bhandara Crime : जादूटोण्याच्या संशयावरून 40 जणांची एकाला मारहाण, समाज मंदिरात डांबून ठेवलं अन्...; भंडाऱ्यातील धक्कादायक घटना
जादूटोण्याच्या संशयावरून 40 जणांची एकाला मारहाण, समाज मंदिरात डांबून ठेवलं अन्...; भंडाऱ्यातील धक्कादायक घटना
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.