Chhaava Box Office Collection Day 6: चोहीकडे फक्त 'छावा'चीच हव्वा; सहाव्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ठरला तिसरा चित्रपट, 200 कोटींपासून इंचभर दूर
Chhaava Box Office Collection Day 6: विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटानं थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट खूप कमाई करत आहे आणि प्रदर्शित झाल्यापासून 6 दिवसांत त्यानं 200 कोटी रुपये कमावले आहेत.

Chhaava Box Office Collection Day 6: विक्की कौशल (Vicky Kaushal) , रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'छावा' (Chhaava Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. हे ऐतिहासिक नाटक रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच प्रचंड कमाई करत आहे आणि नवा विक्रम रचत आहे. विकेंडला तर 'छावा'नं धुमाकूळ घातलाच, पण विकडेजमध्येही 'छावा' दमदार कमाई करत आहे. 2025 सालचा सर्वात मोठा चित्रपट ठरलेल्या 'छावा'नं त्याच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच, पहिल्या बुधवारी किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...
'छावा' नं सहाव्या दिवशी किती कमाई केली?
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्यावर आधारित 'छावा' या ऐतिहासिक चित्रपटानं थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून इतके प्रेम मिळत आहे की, निर्मातेही ते पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. मनोरंजक गोष्ट म्हणजे, 2025 मध्ये अक्षय कुमारच्या स्काय फोर्सचे आतापर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पण, 'छावा' सारखा कोणताही चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही. विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली आणि आठवड्याच्या शेवटीही या चित्रपटानं चांगली कमाई केली. आठवड्याच्या दिवसात चित्रपटांच्या कमाईत सामान्यतः घट होत असली तरी, सोमवारी 'छावा' चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घट झाली. परंतु मंगळवारी पुन्हा एकदा त्यात वाढ दिसून आली, ज्यामुळे व्यापार तज्ज्ञांनाही आश्चर्य वाटलं. सध्या हा चित्रपट प्रचंड नफा कमवत आहे.
View this post on Instagram
- सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'छावा'नं 31 कोटींचं कलेक्शनसह बॉक्स ऑफिसवर आपलं खातं उघडलं.
- दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 37 कोटी रुपये कमावले.
- 'छावा'नं तिसऱ्या दिवशी 48.5 कोटींची कमाई केली.
- तर चौथ्या दिवशी विक्की कौशल स्टारर चित्रपटाने 24 कोटी रुपये कमावले.
- 'छावा'नं रिलीजच्या पाचव्या दिवशी 25.25 कोटी रुपये कमावले आहेत.
- आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच, पहिल्या मंगळवारी झालेल्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'ने रिलीजच्या सहाव्या दिवशी 32 कोटींची कमाई केली आहे.
- यासह, 'छावा'नं रिलीजच्या 6 दिवसांत 197.75 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
'छावा' नं सहाव्या दिवशी 'जवान-पठाण' ते 'अॅनिमल' अन् इतर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत...
'छावा'च्या रिलीजच्या सहाव्या दिवशी कलेक्शनमध्ये वाढ दिसून आली. 32 कोटी रुपयांची कमाई करून पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केलं. यासह, विक्की कौशलच्या चित्रपटानं सहाव्या दिवसाच्या कलेक्शनच्या बाबतीत पठाण-जवान, अॅनिमल, स्त्री 2 आणि बाहुबली 2 यासह अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आणि तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. सहाव्या दिवशी सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट म्हणजे, 'पुष्पा 2'.
- 'पुष्पा 2' नं सहाव्या दिवशी 36 कोटींची कमाई केली
- 'गदर 2' नं सहाव्या दिवशी 32.37 कोटी रुपये कमावले.
- 'छावा'नं सहाव्या दिवशी 32 कोटींची कमाई केली आहे.
- अॅनिमलची सहाव्या दिवसाची कमाई 27.8 कोटी रुपये होती.
- बाहुबली 2 नं सहाव्या दिवशी 26 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
- स्त्री 2 नं सहाव्या दिवशी 25.8 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
- पठाणनं सहाव्या दिवशी 25.5 कोटी रुपये कमावले.
- 'जवान'नं सहाव्या दिवशी 24 कोटी रुपये कमावले.
'छावा' 200 कोटींपासून इंचभर दूर
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट आता 200 कोटींपासून एक इंचभर दूर आहे. गुरुवारी हा चित्रपट हा आकडा ओलांडेल. 'छावा' ज्या वेगानं प्रगती करतोय, त्यामुळे तो लवकरच 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
