Latur News : लातुरात मटका बुकींची दादागिरी, पीएसआयला केली मारहाण
मटका बुकिंचे धाडस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पोलीस उपनिरीक्षकने अवैध धंदे करू नका असा दम दिल्याकारणाने चिडलेल्या मटका बुकीने आपल्या वीस पंचवीस साथीदारासह पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला केला आहे.
लातूर : पोलीस उपनिरीक्षकास (PSI) मटका बुकींनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वीस ते पंचवीस जणांचा जमाव पोलीस उपनिरीक्षकावर धावून गेला. पोलीस ठाण्याला माहिती कळूनही मदतीला आले नाहीत असा पोलीस उपनिरीक्षकानी आरोप केला आहे. या आरोपानंतर लातूर पोलीस (Latur Police) दलात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
मटका बुकिंचे धाडस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पोलीस उपनिरीक्षकने अवैध धंदे करू नका असा दम दिल्याकारणाने चिडलेल्या मटका बुकीने आपल्या वीस पंचवीस साथीदारासह पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला केला आहे. हा सर्व प्रकार महामार्गाच्या बाजूलाच सुरू होता. रस्त्यातील प्रवाशांनी मध्यस्थी करून विषय मिटवला खरा मात्र आता विविध चर्चा सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत घुले हे पेट्रोलिंगसाठी काल दुपारी बाहेर पडले होते. शेरा गावाजवळ त्यांना काही लोक जुगार खेळताना दिसून आले. पुन्हा या भागात जुगार खेळताना दिसल तर खडक कारवाई करू असा दम तेथील लोकांना दिला.संध्याकाळी ते रेनापूर पोलीस ठाण्याकडे निघाले असता त्या भागातील मटकाबुकी आणि 20 ते 25 जण त्यांच्यावर चालून गेले. हातात धारदार शस्त्र आणि काठी असलेल्या जमावाने पोलीस उपनिरीक्षक हनुमंत घुले यांना धक्काबुक्की केली कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार लातूर औरंगाबाद महामार्गावरच सुरू होता. रस्ता बंद असल्याकारणाने या भागातील प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मध्यस्थी करत भांडण मिटवलं.
मदतीला कुणी आलं नाही, हनुमंत घुलेंचा आरोप
मला मारहाण सुरू होती याची माहिती मी रेणापूर पोलीस ठाण्याला दिली. पोलीस निरीक्षक ठाण्यात होते मात्र त्यांनी कोणालाही पाठवलं नाही, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक हनुमंत घुले यांनी दिली आहे. याबाबतपोलीस उपनिरीक्षक हनुमंत घुले यांनी रेनापुर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत असल्याची माहिती काल संध्याकाळी दिली होती. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अद्यापही त्याप्रकरणी पुढे काय झालं याची माहिती पोलीस ठाण्यातून उपलब्ध होत नाही. अद्यापही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. पोलिसांचे आणि मटका बुकींचे कायमच हितसंबंध असतात असा आरोप होत आलेला आहे. यामुळेच काल संध्याकाळी घडलेल्या घटनेचा अद्याप गुन्हा दाखल झाला नाही अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. या घटनेचे काही व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, घटनेची माहिती कळाली आहे. काही वेळात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल. या घटनेतील दोषी असलेल्यांवर योग्य ती कारवाई होईलच, अशी माहिती लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षकास मटका बुकीने मारहाण केली. वीस ते पंचवीस जणांचा जमाव पोलीस उपनिरीक्षकावर धावून गेला. पोलीस ठाण्याला माहिती कळूनही मदतीला आले नाहीत, असा आरोप पोलीस उपनिरीक्षकाने केला आहे. लातूर पोलीस दलात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. मटका बुकिंचे धाडस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पोलीस उपनिरीक्षकने अवैध धंदे करू नका असा दम दिल्या कारणाने चिडलेल्या मटका बुकीने आपल्या वीस पंचवीस साथीदारासह पोलीस उपनिरीक्षकावर हमला केला. हा सर्व प्रकार महामार्गाच्या बाजूलाच सुरू होता. रस्त्यातील प्रवाशांनी मध्यस्थी करून विषय मिटवला खरा मात्र आता विविध चर्चा सुरू आहेत.
20 ते 25 जणांनी केला हल्ला
लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत घुले हे पेट्रोलिंगसाठी काल दुपारी बाहेर पडले होते. शेरा गावाजवळ त्यांना काही लोक जुगार खेळताना दिसून आले. पुन्हा या भागात जुगार खेळताना दिसले तर कडक कारवाई करू असा दम तेथील लोकांना दिला संध्याकाळी ते रेनापूर पोलीस ठाण्याकडे निघाले असता त्या भागातील मटकाबुकी आणि 20 ते 25 जण त्यांच्यावर चालून गेले. हातात धारदार शस्त्र आणि काठी असलेल्या जमावाने पोलीस उपनिरीक्षक हनुमंत घुले यांना धक्काबुक्की केली कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार लातूर औरंगाबाद महामार्गावरच सुरू होता. रस्ता बंद असल्याकारणाने या भागातील प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मध्यस्थी करत भांडण मिटवलं.
मदतीला कुणी आलं नाही : हनुमंत घुले
मला मारहाण सुरू होती याची माहिती मी रेणापूर पोलीस ठाण्याला दिली.. पोलीस निरीक्षक ठाण्यात होते मात्र त्यांनी कोणालाही पाठवलं नाही, असा आरोप पोलीस उपनिरीक्षक हनुमंत घुले यांनी केला आहे. याबाबतपोलीस उपनिरीक्षक हनुमंत घुले यांनी रेनापुर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत असल्याची माहिती काल संध्याकाळी दिली होती. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अद्यापही त्याप्रकरणी पुढे काय झालं याची माहिती पोलीस ठाण्यातून उपलब्ध होत नाही. अद्यापही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. पोलिसांचे आणि मटका बुकिंचे कायमच हितसंबंध असतात असा आरोप होत आलेला आहे. यामुळेच काल संध्याकाळी घडलेल्या घटनेचा अद्याप गुन्हा दाखल झाला नाही अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. या घटनेचे काही व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. घटनेची माहिती कळाली आहे. काही वेळात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल. या घटनेतील दोषी असलेल्यांवर योग्य ती कारवाई होईलच, अशी माहिती लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिली आहे.
हे ही वाचा :