एक्स्प्लोर

Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन

Makar Sankranti : ठाण्यात महापालिकेच्या दक्षता पथकांमार्फत 450 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकल वापराचे सुमारे 290 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला असून 13 लाख रुपयांचा दंड करण्यात आला.

ठाणे : पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा किंवा चिनी दोरा किंवा नायलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांसाठी तसेच पक्ष्यांना घातक ठरतो. त्यामुळे या मांजाच्या वापरावर ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात त्याअनुषंगाने सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण 450 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही. मात्र या तपासणीत एकल वापराचे सुमारे 290 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच, 13 लाख रुपयांचा दंड करण्यात आला. पतंग उडवण्यासाठी तिक्ष्ण धातू किंवा काच घटक किंवा चिकट पदार्थ तसेच धागा मजबूत करणारा पदार्थ नसलेला केवळ सुती धागा वापरण्यास परवानगी आहे. 

चिनी मांजा म्हणून ओळखला जाणारा हा धागा तयार करण्यासाठी बारीक चूरा केलेली काच, धातू किंवा अन्य तिक्ष्ण पदार्थांचा वापर करण्यात येतो. अशा धाग्याचे उत्पादन, विक्री, साठवण आणि वापर यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने निर्बंध घातलेले आहेत. या धाग्याचे जैविकरित्या विघटन होत नसल्याने मल प्रणाली, जलनि:सारण बाधित होते. तसेच असे पदार्थ खाल्ल्याने जनावरांनाही इजा होते. तसेच, हा धागा विद्युत वाहक असल्याने वीज साहित्य आणि वीज उपकेंद्र यांच्यावरही भार येऊन वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते.

दक्षता पथकांमार्फत तपासणी सुरू         

चिनी मांजा तथा सिंथेटिक-नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण आणि वापर टाळण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर तपासणी आणि जप्ती मोहीम नियमितपणे राबविण्यात येत आहे. त्यासाठी, प्रत्येक प्रभाग समितीत सहाय्यक आयुक्त स्तरावर कर निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, प्रदूषण नियंत्रण कर्मचारी यांचे दक्षता पथक तयार करण्यात आले आहे. तसेच, स्थानिक पोलिसांनाही याविषयी माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत या तपासणी मोहिमेत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण 450 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही.

290 किलो प्लास्टिक जप्त

या तपासणी दरम्यान, एकल वापराचे सुमारे 290 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच, 13 लाख रुपयांचा दंड करण्यात आला. 

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक व इमेल

प्रतिबंधित सिंथेटिक, नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण, पुरवठा किंवा वापर याबाबतच्या तक्रारी करण्यासाठी ८६५७८८७१०१ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर pcctmc.ho@gmail.com या इमेलवरही तक्रार नोंदवता येईल.

 

महत्त्वाच्या बातम्या

Thane DCC Bank Election : ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंचा करिष्मा; बविआचे वर्चस्व मोडीत
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंचा करिष्मा; बविआचे वर्चस्व मोडीत
Tukaram Mundhe : सडलेले दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड अन् खाद्यपदार्थ ताब्यात, आऊटलेटला टाळे ठोकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची ठाण्यातील नौपाडात मोठी कारवाई
सडलेले दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड अन् खाद्यपदार्थ ताब्यात, आऊटलेटला टाळे ठोकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची ठाण्यातील नौपाडात मोठी कारवाई
Thane District Central Co-Operative Bank Ltd Election 2026: ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे-चव्हणांच्या राजकीय चाणक्यनीतीचा करिष्मा; महायुतीचा दणदणीत विजय 
ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे-चव्हणांच्या राजकीय चाणक्यनीतीचा करिष्मा; महायुतीचा दणदणीत विजय 
Dombivli:'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
Embed widget