Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
BJP Maha Adhiveshan : शिर्डी येथे आयोजित भाजपच्या महाअधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.
Amit Shah on Sharad Pawar & Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. खरी शिवसेना आणि खऱ्या राष्ट्रवादीचाही मोठा विजय झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात 1978 पासून शरद पवार (Sharad Pawar) यांनी दगा-फटक्याचे राजकारण सुरु केले. त्याला 20 फूट जमिनीत गाढण्याचे काम तुम्ही केले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 2019 साली आपल्या सोबत द्रोह केला, त्यांना आपण त्यांची जागा दाखवून दिली, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली. शिर्डी येथे आयोजित भाजपच्या महाअधिवेशनात (BJP Maha Adhiveshan) ते बोलत होते.
अमित शाह म्हणाले की, देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. इतक्या मोठ्या संख्येने आपले कार्यकर्ते आमदार झाले, मंत्री झाले. खरी शिवसेना आणि खऱ्या राष्ट्रवादीचाही मोठा विजय मिळाला. महाराष्ट्राच्या राजकारणात 1978 पासून शरद पवार यांनी दगा-फटक्याचे राजकारण सुरु केले. त्याला 20 फूट जमिनीत गाढण्याचे काम तुम्ही केले आहे. उद्धव ठाकरे यांनी 2019 साली आपल्या सोबत द्रोह केला, बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांतांना सोडले. त्या उद्धव ठाकरेंना आपण त्यांची जागा दाखवली. 1978 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरता दिसून आली. त्या अस्थिरतेच्या राजकारणाला संपवून तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचे स्थिर सरकार निवडून देण्याचे काम केले, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
परिवार वादाला तुम्ही फटकारले
ते पुढे म्हणाले की , लोकसभा निवडणुकीनंतर आमचे सरकार बनेल, असं ते स्वप्न पाहत होते, त्यांचे स्वप्न भंग करण्याचे काम तुम्ही केले. सिद्धांताचे राजकारण करण्याचे काम तुम्ही केले. परिवार वादाला तुम्ही फटकारले. लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांना मी धन्यवाद देतो. शरद पवार पत्रकारांना शिकवत होते. आता मी शरद पवार यांना शिकवतो. कुठे किती जागा जिंकल्या? तिकीट वाटपात काही नाराज झाले, मात्र तरीही कमळ आणि महायुतीला मदत केली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष खरा असल्याचे तुम्ही दाखवून दिले.
आगामी निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी व्हायचंय
2024 वर्ष हे भाजपसाठी चांगले राहिले आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. हरियाणामध्ये भाजप तिसऱ्यांदा जिंकली. 2024 हे वर्ष महत्वाचं वर्ष आहे. हा इतिहास लिहिला जाईल. आम्ही थकणारे नाहीत. महाराष्ट्रात 40 लाख सदस्य बनले आहेत. एकूण दीड कोटी सदस्य बनवायचे आहेत. दीड महिन्यात पुढे जायचं आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी व्हायचे आहे. विरोधकांना एकही जागा मिळणार नाही. सर्वच ठिकाणी भाजप आली पाहिजे. तुमचे आभार मानायचे आहेत, सोबत पुढील कामदेखील सांगायचे आहे, असेही अमित शाह यांनी म्हटले.
आणखी वाचा