Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
भाजपचे महाअधिवेशन (BJP Maha Adhiveshan) आज शिर्डीत (Shirdi) पार पडत आहे. या अधिवेशनाची ‘श्रद्धा, सबुरी अन् भाजपची महाभरारी’ अशी टॅग लाईन असून राज्यातील भाजपच्या 15 हजार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. या अधिवेशनातून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार घणाघात केलाय.
आशिष शेलार म्हणाले की, एकच प्रस्ताव आपण या अधिवेशनात घेऊन आलो आहे. तो म्हणजे तुमचे धन्यवाद, आभाराचा हा प्रस्ताव आहे. मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवला. मतदारांचे अभिनंदन आणि धन्यवाद दिले पाहिजे. विरोधकांची पोपटपंची केराच्या टोपलीत मतदारांनी टाकली. विश्वविख्यात प्रवक्ते पोपटलाल म्हणत होते की, मोदी यांची हवा संपली. 31 जुलैचे उद्धव ठाकरे यांचे भाषण विसरु शकत नाही. देवेंद्र तू राहशील किंवा मी राहील, असे ते म्हणाले. पंतप्रधानांची उरलीसुरली उतरवून टाकू असे ते म्हणाले. शरद पवार यांच्या पक्षाने कोणाकोणाची मदत घेतली होती. शरद पवार यांच्या पक्षाचे सल्लागार गोष्टीतील गाढवाप्रमाणे झाले. 88 टक्के स्ट्राईक देणारा आपला देवाभाऊ आहे. देवेंद्र फडणवीस व्यक्ती नाही तर शक्ती आहे, असे त्यांनी म्हटले.