Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं काम सुरु केलं होतं. त्यांनी जलयुक्त शिवार सुरु केल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. आता या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने ते दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करुन प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देण्याचं काम करतील असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. शरद पवार अनेक वर्ष देशात मंत्री होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होते. मात्र, ते शेतकरी आत्महत्या थांबवू शकले नाहीत असे म्हणत अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. पुढच्या वेळेस देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत येण्यापीर्वी सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी मिळेल असेही शाह म्हणाले.