Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special Report
Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special Report
ठाकरेंच्या शिवसेनेनं २४ तासांपूर्वी सुरु केलेल्या स्वबळाच्या भाषेवर स्पष्टीकरण देत काँग्रेसला गैरसमज करून न घेण्याचं आवाहन केलं. मविआ आणि इंडिया आघाडीच्या स्थापनेचं मूळ उद्दिष्ट मांडत संजय राऊतांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले. माध्यमांसमोर ही शाब्दिक सारवासारव करण्यात शिवसेनेला यश आलं असलं तरी प्रत्यक्षात गेल्या काही दिवसांतल्या घडामोडी मात्र वेगळंच चित्र उभं करत असल्याचं चित्र आहे. मविआमध्ये नेमकं काय घडतंय, याचा आढावा घेऊया, या रिपोर्टमधून. ही होती मविआ नेत्यांची शनिवारची भाषा. भरभरून यश मिळालेली लोकसभा निवडणूक आणि सपाटून मार खावा लागलेली विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढायला हवी होती, अशी भावना नेत्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. एकत्र लढल्याचा पश्चात्ताप व्यक्त करणाऱ्या या प्रतिक्रिया ऐकून मविआ फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा साहजिकच सुरु झाल्या. मात्र आपण मविआच्या फुटीबद्दल काही बोललोच नव्हतो, असं सांगत राऊतांनी आज सारवासारव सुरु केलीय.