Working HOur Special Report : 90 तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला
Working HOur Special Report : 90 तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला
लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी ९० तास काम करण्याचं आवाहन केलं होतं, कॉर्पोरेट नेत्यांनी अशाप्रकारची विधानं केल्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या... सोशल मीडियावर गेले ९० तास हा ट्रेंड सुरु असतानाच, यात आता उद्योगपती आनंद महिंद्रा आणि अदर पुनावाल्यांनी उडी घेतलीशल मीडियावर सध्या #९० तास हा ट्रेंडचं कवित्व अद्याप सुरुच आहे इतकंच नव्हे तर यावरुन आता मीम्सही चांगलेच व्हायरल झाले असून सोशल मीडियावर लोकांनी चांगलाच खरपूस समाचार घेतलाय... आता हेच मीम्स पाहा ना... विचारते कसं जुळलं गं तुझं शेजऱ्यासोबत... त्यावर दुसरीचं हे खोचक उत्तर... आमचे हे एल अँड टी मध्ये कामाला आहेत ना... ९० तास काम करतात... --- आणखीन एक मीम् आहे त्यात तर तुम्ही तुमच्या बायकोकडे बघत बसू नका असं सांगताना एल अँड टीला कोपरखळी लगावली आहे... --- बाकीची जोडपी रविवारी रोमान्स करतात आणि एल अँड टीचे चेअरमन मात्र कामावर असतात असं यातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय... --- इस प्यार से मेरी तरफ ना देखो, नौकरी चली जाएगी असं एक बिचारा आपल्या बायकोला म्हणताना दाखवलाय... --- अहो, इतकंच नाही तर सीरम इन्स्टीट्यूचे अदरपुनावाला यांनी देखील यामध्ये उडी घेतली... अदर पुनावाला यांनीदेखील आनंद महिंद्रांना ट्विटमध्ये मेन्शन करत, कामाच्या तासापेक्षा कामाची परिणामकारकता अधिक महत्त्वाची असल्याची म्हटलं असून, सुब्रमण्यम यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केलीय...