पाण्यासाठी वन वन भटकणाऱ्या हरणांना वाहनांच्या धडका, महिन्यात 7 हरणांचा मृत्यू
Latur : लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झालं आहे. गावात शेत शिवारात पाणी नसल्यामुळे सर्वसामान्य लातूरकर हैराण आहेत. नदी -नाले आटले आहेत.
![पाण्यासाठी वन वन भटकणाऱ्या हरणांना वाहनांच्या धडका, महिन्यात 7 हरणांचा मृत्यू Latur Deer wandering in forests for water are hit by vehicles, 7 deer die in a month Marathi News पाण्यासाठी वन वन भटकणाऱ्या हरणांना वाहनांच्या धडका, महिन्यात 7 हरणांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/0cf666d65d5a88c10dcb079b50cc57d71717089138790924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Latur : लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झालं आहे. गावात शेत शिवारात पाणी नसल्यामुळे सर्वसामान्य लातूरकर हैराण आहेत. नदी -नाले आटले आहेत. यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी खूप धावपळ करावी लागत आहे. निलंगा तालुक्यातील कलांडी भागात हरणांची मोठी संख्या आहे. पाणी नसल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. यातच काही हरणांनी इतर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यात रस्ता ओलांडताना अनेक हरणांना वाहनांची धडक बसत आहे. या हरणांचा मृत्यूही होत आहे. गेल्या महिनापर्यंत अपघातात सात हरणांनी जीव गमावलाय.
पाण्यासाठी वन वन भटकताना वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू
लातूर जहीराबाद महामार्गावर कलांडी पाटीजवळ वाहनांच्या धडकेत हरणाचा मृत्यू झाला आहे. या भागात हरणांची मोठी संख्या आहे. वन विभागाने या भागात पाणवटे निर्माण करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी पानवटे आहेत, मात्र त्यात पाणी नसल्याकारणाने वन्यजीवांची पाण्यावाचून तडफड होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकताना वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वाहनाचा धडकेत मृत्युमुखी पडलेल्या हरणाला पशुप्रेमींना रस्त्याच्या बाजूला केलं. वनविभाग पुढील तपास करत आहे. जी परिस्थिती गावात आहे त्यापेक्षा बिकट परिस्थिती शेतशिवारात आहे. काही भागात बोरला पाणी आहे मात्र ते ही दहा ते पंधरा मिनिट आहे. शेतातील गुराढोरांना पाणी कुठून द्यावं हा प्रश्न पशुपालकांसमोर उभा आहे. दोन-तीन किलोमीटर इकडे पाणी असेल तिकडे गुरांना घेऊन जाण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. नरसिंग सौंदडे यांच्याकडून आठ जनावर आहेत. गुरांच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था करताना त्यांना चांगलीच धावपळ करावी लागत आहे. पाणी नसल्याने जनावर विकण्याचा त्यांनी विचार केला मात्र ग्राहक लागत नाही. खाटकाला जनावर विकण्यापेक्षा कसं तरी जगू असा विचार त्यांनी केला आहे.
एक महिन्यात सात हरणांचा मृत्यू
पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या हरणांना आपला प्राण गमवावा लागत आहे. निलंगा रेंज वनाधिकारी संतोष बन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ठीक ठिकाणी पाणवटे निर्माण केले आहेत. काही पाणवठे फुटली आहेत. पॉलिथिन लावून ते नीट करण्यात आले आहेत. मागील एक महिन्यात निलंगा रेंजमध्ये निलंगा शिरूरअनंतपाळ आणि देवणी या तीन तालुक्यात रस्ते अपघातात जवळपास सात हरणांचा मृत्यू झाला आहे. या भागात हरणांची संख्या बेसुमार वाढली आहे. जंगलाचे क्षेत्र अत्यल्प आहे. त्यात शेत शिवारात कुठेही चारा नाही. पाण्याची सोय जरी केली तरी पोटासाठी ही हरण सातत्याने मार्गक्रमण करत असतात.
इतर महत्वाच्या बातम्या
Bhima Sahakari Sakhar Karkhana : खासदाराच्या कारखान्याने उसाचे बिल थकवले, फायनान्सचा तगादा, हतबल शेतकऱ्याने ट्रॅक्टर विहिरीत ढकलला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)