(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुस्लिम महिलांना बलात्काराची धमकी देणाऱ्या महंतावर अखेर कारवाई, घटनेच्या 6 दिवसांनंतर पोलिसांनी नोंदवला FIR
Uttar Pradesh News : महंतांच्या या वक्तव्यानंतर मुस्लिम महिलांनी धरणे आंदोलन केले. घटनेच्या सहा दिवसांनंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता.
Uttar Pradesh News : धार्मिक मिरवणुकीत मुस्लिम महिलांवर बलात्कार करण्याची धमकी दिल्याच्या वक्तव्यामुळे महंत बजरंग मुनिदासला सीतापूरमध्ये अटक करण्यात आली आहे. महंतांच्या या वक्तव्यानंतर मुस्लिम महिलांनी धरणे आंदोलन केले. घटनेच्या सहा दिवसांनंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता.
काय प्रकरण होते?
अलीकडेच सीतापूरमध्ये एका द्वेषपूर्ण भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. ज्यामध्ये खैराबादीच्या बडी संगतचे महंत बजरंग मुनी दास द्वेषपूर्ण भाषण देत होते. व्हायरल व्हिडिओमध्ये महंत मुस्लिम महिलांविरोधात द्वेषपूर्ण भाषण देत होते. त्याचा जिल्ह्यातील मुस्लिम महिलांनी तीव्र निषेध केला. त्यानंतर मुस्लीम महिलांनी द्वेषपूर्ण भाषणाविरोधात पोलिसांच्या निषेधार्थ धरणे आंदोलन केले. राष्ट्रीय महिला आयोगानेही महंत यांच्यावर आठवडाभरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
Uttar Pradesh | Mahant Bajrang Muni Das arrested for his controversial remarks on Muslim women. He will be presented in the court soon: RP Singh, Sitapur SP pic.twitter.com/ymwwoTgjbw
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 13, 2022
व्हिडिओमध्ये काय होते?
याप्रकरणी बुधवारी सीतापूर पोलिसांनी महंत बजरंग मुनिदास यांना अटक केली. नुकतेच हेट स्पीचच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महंत जमलेल्या गर्दीसमोर मुस्लिम महिला आणि मुलींबद्दल बोलत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येत आहे. महिलांना घराबाहेर काढून त्यांच्यावर बलात्कार केल्याचे सांगत आहे. 'Zoo Bear' नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या