फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
Vietnam Airlines Vietjet Air Offer : भारतातून व्हिएतनामला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. व्हिएतनामची एअरलाइन व्हिएतजेट एअरने 11 रुपयांमध्ये तिकीटाची ऑफर जाहीर केली आहे.

मुंबई : विमानाने प्रवास करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. विशेषत: भारतासारख्या देशात आजही लाखो लोकांसाठी विमानाने प्रवास करणे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. पण आता असे होणार नाही. आता विमानाची तिकिटे केवळ 11 रुपयांना उपलब्ध आहेत. ही ऑफर व्हिएतनामची एअरलाइन व्हिएतजेट एअरने दिली आहे.
व्हिएतजेट एअरने एक उत्सवी सेल सुरू केला आहे. भारत ते व्हिएतनाम विमानाची तिकिटे केवळ 11 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत (कर आणि शुल्क वगळता). ही ऑफर इको क्लास तिकिटांसाठी आहे आणि ती मुंबई, दिल्ली, कोची आणि अहमदाबाद सारख्या भारतातील प्रमुख शहरांमधून व्हिएतनामच्या हो ची मिन्ह सिटी, हनोई आणि दा नांग सारख्या ठिकाणांसाठी उपलब्ध आहे.
तिकीट कसे बुक करावे?
व्हिएतनाम एअरलाइन Vietjet Air ची ही 11 रुपयांची ऑफर दर शुक्रवारी उपलब्ध असेल. या ऑफरच्या वैधतेबद्दल बोलायचे झाले तर, ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत चालेल. तथापि, ही ऑफर मर्यादित जागांवरच लागू आहे. त्यामुळे तुम्हाला लवकर बुकिंग करावे लागेल. तिकिटे बुक करण्यासाठी, तुम्ही व्हिएतजेट एअरची अधिकृत वेबसाइट www.vietjetair.com किंवा त्यांचे मोबाइल ॲप वापरू शकता.
ऑफरशी संबंधित इतर माहिती
Financial Express च्या वृत्तानुसार, ही ऑफर 31 डिसेंबर 2025 पर्यंत वैध आहे. परंतु काही ब्लॅकआउट डेट्स जसे की सार्वजनिक सुट्ट्या आणि पीक सीझन लागू होतील. म्हणजे त्या दिवशी ही ऑफर लागू नसेल. जर तुम्हाला तुमच्या प्रवासाची तारीख बदलायची असेल तर ते शक्य आहे, पण त्यासाठी ठराविक शुल्क भरावे लागेल. तुम्ही तिकीट रद्द केल्यास, परतावा तुमच्या ट्रॅव्हल वॉलेटमध्ये जमा केला जाईल, परंतु यासाठी शुल्क देखील लागेल.
ही ऑफर खास का आहे?
ही ऑफर केवळ स्वस्तच नाही, तर भारत आणि व्हिएतनाममधील थेट कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठीही हे एक मोठे पाऊल आहे. व्हिएतनाम हे सुंदर नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक स्थळे आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे आणि ही ऑफर तुम्हाला या सुंदर देशाला भेट देण्याची उत्तम संधी देते. तुम्हालाही एकट्याने किंवा कुटुंबासोबत व्हिएतनामला जायचे असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी असू शकते.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
