एक्स्प्लोर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
गेल्या दोन दिवसांत कोकणातील शहरं तापली असून राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद ठाणे जिल्ह्यात झाली आहे. ठाण्यात आज 39 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.

Temperature high in state highest in Thane
1/7

राज्यातील 4 ते 5 दोन दिवस उष्णतेची लाट असणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक विभागाने वर्तवला होता. त्यानुसार, मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या झळा बसत आहेत.
2/7

गेल्या दोन दिवसांत कोकणातील शहरं तापली असून राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद ठाणे जिल्ह्यात झाली आहे. ठाण्यात आज 39 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
3/7

मुंबईत देखील उष्णतेची लाट असून सांताक्रुजमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे.
4/7

राज्यात उन्हाळा सुरू झाला असून नागपूर, सोलापूर जिल्ह्यातही तापमानाने 38 अंश सेल्सियसपर्यंत झळा गाठल्या आहेत. त्यामुळे, नागरिक आत्तापासून छत्री घेऊन किंवा उन्हापासून बचाव करण्याची साधने घेऊन बाहेर पडत आहेत.
5/7

नवी मुंबईत 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून रत्नागिरीत तापमान 37.2 अंशांवर पोहोचले आहे. तर डहाणूत 38.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
6/7

सोलापूरमध्ये 36.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून गोवा देखील तापलं आहे, गोव्याची राजधानी असलेल्या पणजीत 37.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
7/7

मार्च महिन्यात उन्हाळ्याच्या तीव्र झळा बसत असतात. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सूर्यदेव कोपल्याचे दिसून येते. उन्हामुळे अंगाची लाही लाही होऊ घामाच्या धारा लागल्या आहेत
Published at : 26 Feb 2025 08:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion