एक्स्प्लोर
Advertisement
#SareeTwitter सोबत प्रियांकांनी शेअर केला लग्नातला फोटो, नेटीझन्सकडून अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा
सोशल मीडियावर खासकरुन ट्विटरवर जर तुम्ही नजर फिरवलीत तरी एक ट्रेण्ड प्रचंड वायरल होताना तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. हा ट्रेण्ड आहे #SareeTwitter . फक्त सामान्य महिलाच नाही तर राजकारणी, समाजकारणी, सिनेसृष्टीतल्या अनेक अभिनेत्री या पारंपरिक पोशाखावरचं आपलं प्रेम ट्विटरवर व्यक्त करत आहेत.
मुंबई : सोशल मीडियावर विशेषत: ट्विटरवर दररोज कोणता ना कोणता ट्रेण्ड होत असतो, ज्यात सामान्यांपासून व्हीआयपी प्रत्येक जण सहभागी होतो. मागील दोन दिवसांपासून ट्विटरवर #SareeTwitter या हॅशटॅगचा ट्रेण्ड सुरु आहे. या हॅशटॅगसह महिला साडीतील आपला फोटो शेअर करत आहे. याचा मोह राजकारणी महिलांनी आवरता आला नाही. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही आज (17 जुलै) सकाळी एक फोटो शेअर केला. हा फोटो त्यांच्या लग्नाच्या दिवसातील आहे.
राजकारण्यांपासून सामान्यांपर्यंत मोहात पाडणाऱ्या #SareeTwitter ची सुरुवात कशी झाली?
हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शन लिहिलं की, 22 वर्षांपूर्वी माझ्या लग्नाच्या पूजेतील सकाळचा फोटो." सोबतच त्यांनी #SareeTwitter या हॅशटॅगचाही वापर केला होता. प्रियांका गांधी यांचं लग्न 18 फेब्रुवारी 1997 रोजी बिझनेसमन रॉबर्ट वाड्रा यांच्याशी झाला होता.
हा फोटो पाहून अनेकांनी प्रियांका गांधींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.Morning puja on the day of my wedding (22 years ago!) #SareeTwitter pic.twitter.com/EdwzGAP3Wt
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 17, 2019
Happy wedding anniversary @priyankagandhi stay blessed ????I always trolled u but today https://t.co/I5Ebhjje3S happy always !
— Jai Hind ! (@DiehardfrNation) July 17, 2019
मात्र यानंतर प्रियांका गांधींना ट्वीट करुन सांगावं लागलं की, आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस नाही. त्यांनी ट्वीट केलं की, शुभेच्छांसाठी आभार, पण एक जुना फोटो आहे. माझ्या लग्नाचा वाढदिवस फेब्रुवारीमध्ये आहे.सुखद वैवाहिक जीवन की हार्दिक शुभकामनाएं.
— Mahesh Gurjar Mundawar(Youth Congress) (@maheshgurjar631) July 17, 2019
Thanks for all the anniversary wishes...but it’s just a throwback photo for the #SareeTwitter guys, my anniv is in Feb!
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 17, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बातम्या
निवडणूक
निवडणूक
Advertisement