एक्स्प्लोर

डॉ. आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार,  आनंदीबाई गोपाळराव यांची जयंती, इतिहासात आज

इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

On this day in history March 31 :  आज आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. तसं आजच्या दिवसाला खास इतिहास आहे. हा दिवस विविध घटनांचा साक्षीदार आहे. यातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या दिवशी म्हणजेच 31 मार्च 1990 मध्ये 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. भारतात पहिले पोस्ट ऑफिस उघडण्यात आले.  त्याशिवाय आजच्याच दिवशी मर्सिडिजची पहिली कार तयार झाली होती. तर सचिन तेंडूलकर यांनी एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण करून विश्वविक्रम रचला.  याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डॉ. भीमराव आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार  

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 31 मार्च 1990 रोजी मरणोत्तर भारतरत्न सन्मान करण्यात आला होता. भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा आंबेडकरांनी देश आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून त्यांचा भारतरत्नने सन्मान केला. 

समाजातील जातीभेद हटवणं हेच उद्देश समोर ठेवून आंबेडकरांनी आपलं कार्य केलं. यासाठी त्यांनी शिक्षणालाच आपलं शस्त्र बनवलं.  भारत 15 ऑगस्ट, 1947 रोजी स्वातंत्र्य झाल्यानंतर डॉ. आंबेडकर यांना त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर संविधान बनवण्याची जबाबदारी मिळाली. त्यांनी अशा संविधानाची निर्मिती केली जे समाजाच्या प्रत्येक वर्गाला, घटकाला समान वागणूक आणि अधिकार देतं. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ते देशाचे पहिले कायदा मंत्री बनले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण घटना 1956 मध्ये घडली. हजारो अनुयायींसोबत आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याचवर्षी डॉ. आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं. त्यानंतर 34 वर्षांनी म्हणजेच 1990 मध्ये त्यांचा मरणोत्तर भारतरत्नने सन्मान करण्यात आला.

पोस्ट ऑफिस सुरुवात -

ब्रिटीश कालीन भारतात 31 मार्च १७७४ रोजी पहिले पोस्ट ऑफिस कोलकाता येथे सुरु करण्यात आले. संपूर्ण जगात संवादाचे मोठे नेटवर्क म्हणून पोस्ट ऑफिसकडे पाहिले जाते. भारतीय डाक विभागात चार लाखांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

मर्सिडिजची पहिली कार तयार

आजच्याच दिवशी मर्सिडिजची पहिली कार तयार करण्यात आली होती. 1901 मध्ये जर्मनमधील एका राजकीय अधिकाऱ्यासाठी कार तयार करण्यात आली होती. जर्मन उद्योजक एमिल जेन्निलेकच्या मुलीच्या नावावरून मर्सिडिज हे नाव आले आहे.. डेमलर-मोटर्सन-गेसेलस्काफ्ट (डेमलर मोटर्स कॉर्पोरेशन)  यांच्याद्वारे ही मर्सिडिज कार तयार करण्यात आली होती. कार्ल बेन्झ याने जानेवारी 1888 मधे पहिल्या पेट्रोलवर चालणाऱ्या कारचे पेटंट (Benz Patent Motorwagen) घेतले होते. त्यानंतर 1901 मध्ये पहिली कार तयार करण्यात आली होती.  

आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची जयंती 

 भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी झाला होता. डॉ. आनंदीबाई यांचा जन्म कल्याणमधील एका पारंपारिक कुटुंबात झाला होता. वयाच्या 10व्याच वर्षी त्यांचा कल्याणमधील गोपाळराव जोशी यांच्याशी विवाह झाला होता. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पूर्ण करुन मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईंनी एम.डी.ची पदवी मिळवली. ज्या काळात महिलांनी बाहेर पडणंही दुरापास्त होतं त्यावेळी आनंदीबाईंनी थेट डॉक्टर होण्यापर्यंतची मजल मारली होती.

प्रार्थना समाजाची स्थापना - 

समाजसुधारक डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. लोकांमध्ये आस्तिकतेचा भाव जागृत करण्यासाठी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली होती. पुणे, नगर, सातारा इ. ठिकाणी प्रार्थनासमाजाच्या शाखा निघाल्या.  

सचिन तेंडुलकर दस हजारी मनसबदार -

क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला पार केला. दहा हजार धावांचा पल्ला पार करत सचिन तेंडुलकर याने विश्वविक्रमला गवसणी घातली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज होता. शेन वॉर्नच्या चेंडूवर धाव घेत सचिन तेंडुलकर याने दहा हजार धावांचा पल्ला पार केला होता.  सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 18426 धावा केल्या आहेत. 

आयफेल टॉवरचे उद्घाटन 

आयफेल टॉवर ही जगप्रसिद्ध वास्तू पाहण्यासाठी असंख्य पर्यटक दररोज पॅरिसला भेट देत असतात. त्याच आयफेल टॉवरचे 31 मार्च 1889 उद्घाटन करण्यात आले. फ्रान्सचे तत्कालीन पंतप्रधान पियरे तिरार्ड यांनी आयफेल टॉवरचे उद्घाटन केले होते. आयफेल टॉवरचे बांधकाम हे 1887 ते 1889 या काळात करण्यात आले. 324 मीटर उंच म्हणजे जवळपास 81 मजले इमारती एवढे उंची. ही मानवनिर्मित बांधणी जगातील सर्वात उंच बांधणी म्हणून ओळखले जाते. 
 
जयंत नारळीकर यांना कलिंग पुरस्कार प्रदान 

खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना युनेस्कोतर्फे देण्यात येणाऱ्या कलिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान क्षेत्रांत प्रभावी कामगिरी केल्याप्रकरणी त्यांना सन्मानित करण्यात आले.  डॉ. नारळीकर यांच्या महान कार्याची दखल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांना अनेक मान-सन्मान प्राप्त झाले. 1965 मध्ये त्यांना पद्मभूषण, तर 2004 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेय.

सहार विमानतळाचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ -

31 मार्च 1999 रोजी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ‘सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ’ ‘छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ म्हणून ओळखला जाईल अशी घोषणा केली होती. त्यानंतर 2018 मध्ये विमानतळाच्या नावात 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' अशी सुधारणा करण्यात आली. 1850 एकर परिसरात विस्तारलेले हे विमानतळ भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. 

अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म - 

महाराष्ट्रीयन मराठी नाटककार बळवंत पांडुरंग किर्लोस्कर उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा 31 मार्च 1843 रोजी जन्म झाला. अण्णासाहेब किर्लोसकर हे मराठीतील पहिले संगीत नाटककार, गायकनट आणि नाट्यशिक्षक होते. अण्णासाहेबांच्या नाट्य आणि काव्य गुणांची स्वतंत्र प्रतिभा दर्शवणारे त्यांचे नाटक म्हणजे ‘संगीत सौभद्र’.

31 मार्च 2001 रोजी जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओरिसामधील बालासोर येथे यशस्वी चाचणी झाली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget