एक्स्प्लोर

Nashik Crime : भूषण गगराणींचा पीए असल्याचं भासवून उकळले तब्बल 71 लाख, 'असा' सापडला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात

Nashik Crime : भूषण गगराणी यांचा पीए असल्याचे सांगून 71 लाख 50 हजारांची फसवणूक करणाऱ्यास नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Nashik Crime : मंत्रालयातील तत्कालीन मुख्य सचिव भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांचा पीए (PA) असल्याचे सांगून 71 लाख 50 हजारांची फसवणूक करणाऱ्या प्रकाश धोंडू कदम या भामट्यास गुंडाविरोधी पथकाने जेरबंद केले आहे. लासलगाव (Lasalgaon) परिसरातील विंचूर फाटा (Vinchur Phata) येथे सापळा रचून गुंडाविरोधी पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, संकेत शिवाजी कोटकर यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सन 2023 मध्ये संशयित प्रकाश धोंडू कदम हे स्वतः महाराष्ट्र राज्य मंत्रालयातील तत्कालीन मुख्य सचिव भूषण गगराणी यांचे पीए असल्याचे सांगून तसेच त्यांची मोठमोठ्या व्यक्तींची ओळख असल्याचे दाखवून संकेत शिवाजी कोटकर व साक्षीदार यांना सरकारी नोकरीला लावून देतो, असे आमिष दाखवून त्यांच्च्याकडून वेळोवेळी 71 लाख 50 हजार रुपये उकळले. 

गुन्हा दाखल झाल्यापासून फरार 

याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात (दि.6) फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील संशयिताचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला दिले होते. त्या अनुषंगाने गुन्ह्यातील संशयित प्रकाश धोंडू कदम (रा. बदलापूर, जि. ठाणे) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. संशयित आपल्या घरी न राहता कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर व संभाजीनगर आदी जिल्ह्यांत लपून फिरत होता. 

सापळा रचून संशयितास घेतले ताब्यात 

संशयित हा फिरता असल्याने त्याची माहिती काढणे अवघड असतानाही गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी मानवी कौशल्य व तांत्रिक कौशल्य वापरून माहिती काढली. संशयित लासलगाव, निफाड या भागात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार तत्काळ गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत व राजेश राठोड यांच्यासह पथक तयार करून लासलगाव येथे रवाना झाले. संशयित हा लासलगाव येथे असल्याची माहिती मिळाल्याने लासलगाव परिसरात संशयिताच्या वर्णनानुसार स्थानिक लोकांकडून त्याची माहिती घेऊन विंचूरफाटा, लासलगाव, नाशिक येथे सापळा रचून संशयित प्रकाश धोंडू कदम यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासासाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Swargate Bus Depot Case: दोघांमध्ये पैशाचा वाद, दोघांच्या संमतीने बसमध्ये...; आरोपी दत्ता गाडेचे वकील काय काय म्हणाले?

Prashant Koratkar : शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारा प्रशांत कोरटकर सापडेना, पण आता नागपूरमध्येही गुन्हा दाखल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेला खिंडार पाडलं
राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेला खिंडार पाडलं
Solapur Angar nagarpanchayat: उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, 'अजित पवारss'
उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, 'अजित पवारss'
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Riya Patil : कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati NCP VS NCP बारामतीत पवार विरुद्ध पवार! काका पुतण्यात जुंपली Special Report
Nashik Black Magic:सोन्याचं आकर्षण,भोंदूकडून शोषण;महिलेच्या कुटुंबाकडून लुटले 50 लाख Special Report
Ajit Pawar Baramati : बारामती, अजितदादांचं घर आणि जादूटोणा; कुणाच्या करामती Special Report
Maoist Hidma : क्रूरकर्म्याचा खात्मा, संपला हिडमा; कशी संपवली हिडमाची दहशत? Special Report
Kolhapur Politics : कागलची कुस्ती, वस्ताद कोण? कागलच्या आखाड्यात दोन कट्टर शत्रू एकत्र Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेला खिंडार पाडलं
राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेला खिंडार पाडलं
Solapur Angar nagarpanchayat: उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, 'अजित पवारss'
उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, 'अजित पवारss'
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Riya Patil : कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
Ramesh Pardeshi: संघाचा गणवेश घालून मिरवणाऱ्या पिट्या भाईचा राज ठाकरेंकडून सर्वांदेखत पाणउतारा, मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करताच म्हणाला...
संघाचा गणवेश घालून मिरवणाऱ्या पिट्या भाईचा राज ठाकरेंकडून सर्वांदेखत पाणउतारा, मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करताच म्हणाला...
Shivsena Vs BJP: भाजपचं मॅन टू मॅन मार्किंग, शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणाऱ्यांना अचूक हेरुन पक्षात घेतलं, नेमकं काय घडलं?
भाजपचं मॅन टू मॅन मार्किंग, शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणाऱ्यांना अचूक हेरुन पक्षात घेतलं, नेमकं काय घडलं?
Pune winter: आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
Embed widget