Akola News : अकोल्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
Akola News : 'नीट' परिक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना अकोल्यात घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Akola News : बारावी 'नीट' परिक्षेचे (NEET Exam) क्लासेस करणार्या विद्यार्थ्यांनं (Student) टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलंय. प्रसन्न वानखडे असं या मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मेहकर (Mehkar) तालुक्यातल्या बेलगावचा रहिवाशी आहे.
अकोल्यातील आकाशवाणी परिसरातील जलाराम सोसायटीत तो भाड्याच्या खोलीत राहत होता. या खोलीत गळफास घेत त्याने आपलं जीवन संपवलंय. वर्गमित्रासह त्याचा नातेवाईक असलेला पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचार्याचा जाच असह्य झाल्याच्या निराशेतून या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय.
मृतक विद्यार्थ्याविरोधात दाखल झाला होता गुन्हा
याबाबत अधिक माहिती अशी की, अकोल्यात बारावीतील 'नीट' परिक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने मोठी खळबळ उडाली आहे. मृतक विद्यार्थी प्रसन्न वानखडे आणि एका दुसर्या एका विद्यार्थ्यामध्ये मागच्या महिन्यात शुल्लक कारणावरून वाद झाला होतय. या वादावरून मृतक विद्यार्थ्याविरोधात सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस ठाण्यातील रमेश खंडारे नामक जमादाराने विद्यार्थ्याला प्रकरणातून सोडण्यासाठी एक लाख रुपयाची मागणी केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला. यासोबतच अकोला पोलिसांवर अनेक गंभीर आरोप कुटुंबंयांनी केले आहेत. यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आत्महत्येला जबाबदार असणारे लोख जर दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे आश्वासन पोलिसांनी नातेवाईकांना दिले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
