बापासाठी काहीपण! जखमी वडिलांसाठी 35 किमी सायकल रिक्षा चालवत गाठलं रुग्णालय
Odisha News : एका 14 वर्षांच्या मुलीने तिच्या जखमी वडिलांना 35 किमी दूर रिक्षा चालवत रुग्णालयात नेले. वडिलांसाठीचं प्रेम आणि मुलीचं धैर्य पाहून सर्वच स्तरावर तिच कौतुक होत आहे.
Odisha Bhadrak Hospital Incident : एका 14 वर्षांच्या मुलीने जखमी वडिलांना रुग्णालयात (Hospital) नेण्यासाठी 35 किमी दूर सायकल रिक्षा (Cycle Riksha) चालवली. ओदिशामधील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीने जखमी वडिलांना उपचारांसाठी 35 किमी दूर असलेल्या रुग्णालयान नेण्यासाठी सायकल रिक्षा चालवली आणि रुग्णालय गाठलं. 22 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. या मुलीचे वडील शंभूनाथ गत भांडणामध्ये गंभीर जखमी झाले होते, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी या मुलीने खूप कष्ट घेतले.
जखमी वडिलांसाठी 35 किमी सायकल रिक्षा चालवत गाठलं रुग्णालय
स्थानिक नागरिक आणि पत्रकारांना एक मुलगी सायकल रिक्षावर (Trolly Auto) वडिलांना घेऊन जातान दिसली, तेव्हा ही बाब समोर आली. मुलगी जखमी वडीलांना घेऊन गावापासून दूर असलेल्या धामनगर येथील रुग्णालयात गेली. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, नदीगन गावातील रहिवासी मुलगी तिच्या जखमी वडिलांना घेऊन उपचारासाठी रुग्णालयात पोहोचली. हे रुग्णालय तिच्या गावापासून 14 किमी दूर होतं.
14 वर्षीय मुलीला सलाम
यानंतर वडिलांची प्रकृती पाहता धामनगर रुग्णालयातील (Dhamnagar Hospital) डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी त्यांना भद्रक जिल्हा मुख्यालय रुग्णालयात (DHHB) घेऊन जाण्यास सांगितलं. वडिलांना रुग्णालयात नेण्यासाठी पुरेसे पैसे आणि साधन दोन्ही नसल्यामुळे वडिलांवर उपचार करण्याच्या दृढ निश्चयाने मुलीने ट्रॉली रिक्षावरून (Trolly Auto) वडिलांना जिल्हा रुग्णालयात नेलं. जिल्हा रुग्णालयातून वडिलांना ट्रॉलीवर घेऊन घरी परतत असताना मुलीला लोकांनी पाहिले.
'रुग्णवाहिकेला फोन करण्यासाठी मोबाईल फोन नव्हता'
यावेळी स्थानिकांना मुलीला विचारले असता तिनं सांगितलं की, भद्रक डीएचएचच्या डॉक्टरांनी वडिलांना आठवड्यानंतर ऑपरेशनसाठी आणण्याचा सल्ला दिला आहे. वडिलांना घरी आणण्यासाठी तिच्याकडे कोणतंही साधन नव्हते किंवा रुग्णवाहिका कॉल करण्यासाठी मोबाईल फोनही नव्हता. त्यामुळे वडिलांना रुग्णालयात नेण्यासाठी तिने ट्रॉलीचा वापर केला. वडिलांसाठीचं प्रेम आणि मुलीचं धैर्य पाहून सर्वच स्तरावर तिच कौतुक होत आहे.
लोकप्रतिनिधींसह स्थानिक प्रशासनही मदतीसाठी धावलं
भद्रकचे आमदार संजीव मल्लिक आणि धामनगरचे माजी आमदार राजेंद्र दास यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ मुलीला गाठून आवश्यक ती सर्व मदत केली. भद्रकचे सीडीएमओ शंतनू पात्रा यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. मुलीचे हे प्रयत्न पाहून स्थानिक अधिकारी आणि इतर समाजातील लोकांनीही कुटुंबाला मदतीचा हात पुढे केला आहे.