सोन्याच्या दरात वाढ की घसरण? कोणत्या शहरात सोन्याला किती दर? सविस्तर माहिती एका क्लिकवर
सध्या सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजणक बातमी समोर आली आहे. कारण सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

Gold Silver Rate: सध्या सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजणक बातमी समोर आली आहे. कारण सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. नवीन वर्षापूर्वी कमोडिटी मार्केटमध्येही सोन्या-चांदीच्या दरांची मजबूती पाहायला मिळत आहे. जागतिक कारणाबरोबरच देशातील लग्नसराईच्या काळात वाढती मागणी हे देखील सोन्या-चांदीच्या किमती वाढण्यामागे एक प्रमुख कारण आहे. जाणून घेऊयात कोणत्या शहरात सोन्या चांदीला किती दर आहे, याबाबतची माहिती.
MCX वर सोन्या-चांदीचे दर काय?
आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरांमध्ये वाढ दिसून येत आहे. 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 340 रुपये किंवा 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 76610 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने विकले जात आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरात देखील किंचित वाढ दिसून येत आहे. त्यात 30 रुपयांनी वाढ होऊन 89356 रुपये प्रति किलोवर व्यवहार होत आहे.
देशातील महत्वाच्या शहरांमध्ये सोन्याचा दर काय?
दिल्ली: 24 कॅरेट सोने 280 रुपयांनी महागून 77,730 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
मुंबई : 24 कॅरेट सोने 280 रुपयांनी महागून 77,730 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
चेन्नई : 24 कॅरेट सोने 280 रुपयांनी महागून 77,730 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
कोलकाता : 24 कॅरेट सोने 280 रुपयांनी महागून 77,730 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
अहमदाबाद : 24 कॅरेट सोने 280 रुपयांनी महागून 77,780 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
बेंगळुरू: २४ कॅरेट सोने 280 रुपयांनी महागून 77,730 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
चंदीगड : 24 कॅरेट सोने 280 रुपयांनी महागून 77,880 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
हैदराबाद : 24 कॅरेट सोने 280 रुपयांनी महागून 77,730 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
जयपूर : 24 कॅरेट सोने 280 रुपयांनी महागून 77,880 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
लखनौ : 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 280 रुपयांनी महागून 77,880 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
नागपूर : 24 कॅरेट शुद्ध सोने 280 रुपयांनी महागून 77,730 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
पाटणा : 24 कॅरेट सोने 280 रुपयांनी महागून 77,780 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोनं घेणं परवड नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला मोठ्या संस्था, श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करताना दिसत आहेत. कारण, सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक नागरिकांना फायद्याची ठरत आहे. कारण दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढतच आहेत. यामुळं सोन्यात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरत आहे. दुसऱ्या बाजदुला सर्वसामान्य लोकांना सोन्याची खरेदी करणं शक्य नाही. त्यामुळं सोन्याच्या किंमती कधी कमी होणार असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
सराफा बाजारातील सोने खरेदीचा ट्रेंड बदलला, ग्राहक करतायेत 'या' नवीन पद्धतीचा अवलंब
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
