Delhi Election Results | सर्व 70 जागांचे कल हाती, 'आप'ला स्पष्ट बहुमत
दिल्ली कुणाची याचा फैसला जवळपास झाला आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यानुसार आम आदमी पक्षाने 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवत बहुमताचा आकडा गाठला आहे. तर भाजपनेही दुहेरी आकडा पार केला आहे.
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष दिल्लीचं तख्त पुन्हा राखणार हे जवळपास निश्चित झालं आहे. दिल्ली विधानसभेच्या सर्व 70 जागांचे कल हाती आले आहेत. या कलांनुसार दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांना साथ दिल्याचं चित्र आहे. आम आदमी पक्ष 51 जागांवर आघाडीवर तर भाजप 19 जागांवर पुढे आहे. काँग्रेसने अद्याप खातंही उघडलेलं नाही. सुरुवातीचे कल आहेत, त्यामुळे आकडे बदलू शकतात. परंतु येत्या काही तासात चित्र स्पष्ट होईल.
दिल्ली विधानसभेसाठी एका टप्प्यात 70 जागांसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. त्यानंतर झालेल्या बहुसंख्य एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्ष सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. निकालातही हेच चित्र दिसलं. 70 जागांच्या दिल्ली विधानसभेत बहुमताचा आकडा 36 आहे. आम आदमी पक्षाने बहुमताचा आकडा सहज गाठला आणि 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भाजपला दुहेरी आकडा गाठण्यात यश आलं आहे.Delhi Election Results LIVE UPDATES | सुरुवातीच्या कलांनुसार दिल्लीत 'आप'चं सरकार
मागील निवडणुकीत 'आप'ला 67 जागांवर यश मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 67 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपच्या खात्यात तीन जागा गेल्या होत्या. याचाच अर्थात मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या जागांमध्ये जवळपास पाच पट वाढ झाली आहे. तर आपच्या जागांमध्ये घट झाली आहे.
दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत. आपचं कार्यालय सजवण्यात आलं असून समर्थकांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. दुसरीकडे भाजप कार्यालयात मात्र शुकशुकाट आहे.
संबंधित बातम्या Delhi Exit Poll | दिल्लीत 'फिर एक बार, केजरीवाल सरकार', आप हॅटट्रिक साधणार, एक्झिट पोलचा अंदाज Poll of Exit Polls | दिल्लीत 'आप'चा बोलबाला, केजरीवालच पुन्हा सत्तेत, सर्व पोल्सचा अंदाज