Covaxin : अल्फा, डेल्टा व्हेरियंटवरही कोवॅक्सिन प्रभावी; अमेरिकन आरोग्य संशोधन संस्थेची पुष्टी
Covaxin : अल्फा, डेल्टा व्हेरियंटवरही भारत बायोटेकनं तयार केलेली कोवॅक्सिन लस प्रभावी असल्याचा दावा अमेरिकन आरोग्य संशोधन संस्थेनं केला आहे.
![Covaxin : अल्फा, डेल्टा व्हेरियंटवरही कोवॅक्सिन प्रभावी; अमेरिकन आरोग्य संशोधन संस्थेची पुष्टी Corona Vaccine covaxin neutralizes alpha delta variants us institute of health research confirms Covaxin : अल्फा, डेल्टा व्हेरियंटवरही कोवॅक्सिन प्रभावी; अमेरिकन आरोग्य संशोधन संस्थेची पुष्टी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/29/202c3dfacbe23dec6149cec4ec04d216_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अमेरिकेच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या एका संशोधनातून दिलासादायक बाबी समोर आल्या आहेत. या संशोधनातून भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेच्या सहयोगानं भारत बायोटेकनं तयार केलेली कोवॅक्सिन लस ही कोरोना व्हायरसच्या अल्फा आणि डेल्टा दोन्ही रुपांवर प्रभावी ठरत असल्याचं निष्पन्न झालं आहे. यासंदर्भात बोलताना एनआयएचनं सांगितलं की, ज्या लोकांनी कोवॅक्सिन लसीचा डोस घेतला होता, त्यांच्या रक्त्याच्या सॅम्पल्सवर दोन संशोधनं करण्यात आली होती. दोन्ही संशोधनांमधून निष्पन्न झालं की, या लसीमुळे शरीरात अधिक अॅन्टीबॉडी तयार होतात. ज्या B.1.17 अल्फा आणि B.1.617 डेल्टा व्हेरियंटला प्रभावीपणे निष्क्रीय करते. मिळालेल्या माहितीनुसार, कोवॅक्सिनमध्ये कोरोना व्हायरसच्या एका रुपाचा समावेश करण्यात आला आहे. जो व्हायरस विरोधात अँटिबॉडी तयार करण्यासाठी प्रतिरक्षा प्रणाली उत्तेजित करतो.
एनआयएचनं दिलेल्या माहितीनुसार, कोवॅक्सिनच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीची निरिक्षण सांगतात की, ही लस सुरक्षित आहे आणि कोरोनावर प्रभावीदेखील आहे. तसेच या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा सुरक्षा डाा या वर्षाअखेरपर्यंत उपलब्ध होईल. तसेच नेशनल इंस्टीट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इंफेक्शियस डिजीजचे निर्देशक अँथनी एच फाउची यांनी बोलताना सांगितलं की, "एक वैश्विक महामारी संपवण्यासाठी वैश्विक प्रक्रियेची आवश्यकता आहे."
एनआयएचकडून वीरोवॅक्सचे संस्थापक सुनील यांचं कौतुक
एनआयएचनं दिलेल्या माहितीनुसार, एनआयएआयडी एडजुवेंट प्रोग्रामने 2009 पासून वीरोवॅक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील डेविड यांच्या शोधाचं समर्थन केलं आहे.
2021 च्या शेवटापर्यंत 70 कोटी लसीच्या डोसचं उत्पादन
एनआयएचने सांगितलं आहे की, कंपनीने एलहायड्रॉक्सिकिम-II चं व्यापक सुरक्षा अध्ययन केलं आणि उत्पादन वाढवण्याची जटिल प्रक्रियेला अंजाम दिलं आहे. भारत बायोटेकला 2021 च्या शेवटापर्यंत कोवॅक्सिनचे 70 कोटी डोसचं उत्पादन करण्याची आशा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)