एक्स्प्लोर

Moderna : मॉडर्नाची लस डेल्टा व्हेरिएंट विरोधात अधिक प्रभावी, कंपनीचा दावा

मॉडर्नाच्या (Moderna) लसीमुळे शरीरात अॅन्टिबॉडी तयार होत असून त्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात (Delta Variant) प्रभावी असल्याचा दावा कंपनीच्या वतीन करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : अमेरिकन लस मॉडर्ना ही डेल्टा व्हेरिएंटविरोधात शरीरात अॅन्टिबॉडी तयार करत असून ती अधिक प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. डेल्टा हा व्हेरिएंट सुरुवातीला भारतात सापडला असून तो सध्या चिंतेचा विषय झाला आहे. डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार जगातील अनेक देशांमध्ये झाला आहे. भारतात नुकतंच या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. 

मॉडर्ना कंपनीच्या वतीनं वेगवेगळ्या व्हेरिएंटची लागण झालेल्या आठ लोकांच्या रक्तगटावर अभ्यास करण्यात आला. या सर्वच व्हेरिएंटविरोधात मॉडर्नाच्या लसीने अॅन्टिबॉडी तयार केल्याचं समोर आलंय. कंपनीच्या वतीनं हा अभ्यास bioRxiv या वेबसाईटवर प्रकाशीत करण्यात आला आहे. 

मॉडर्ना ही फायझरच्या लसीप्रमाण mRNA लस आहे. ही लस आपल्या शरीरात स्पाईक प्रोटिन्स तयार करते, त्यामुळे शरीरात अॅन्टिबॉडी तयार होण्यास मदत होते. हे अॅन्टिबॉडी व्हायरसच्या संपर्कात आलेल्या प्रोटिन्सना ओळखतात आणि त्याच्यावर हल्ला चढवतात. मॉडर्नाची ही लस 18 वर्षांवरील लोकांमध्ये अधिक प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. ही लस कोरोनाच्या विरोधात 94.1 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. 

मॉडर्नाची लस अल्फा, बीटा आणि गॅमा या लसींच्या विरोधात प्रभावी असल्याचं या आधीच कंपनीनं सांगितलं आहे. आता नवीन डेल्टा व्हेरिएंटविरोधातही ही लस प्रभावी असल्याने याचा फायदा अधिक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

भारताच्या औषध महानियंत्रक संस्था  (DCGI) मॉर्डना या अमेरिकेतील औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या कोरोनाविरोधी लसीच्या आप्तकालीन वापराला मंजुरी दिली आहे. अमेरिकेने भारताला कोवॅक्सच्या माध्यमातून मॉर्डनाच्या कोरोना विरोधी लसी देण्याची तयारी दाखवली आहे. मुंबईतील सिप्ला या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून या लसीची आयात करण्यात येणार असून ही लस भारतातील 18 वर्षांवरील नागरिकांना देण्यात येणार आहे.

भारतात या आधी कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या लसींच्या वापराला मंजुरी मिळाली असून आता मॉडर्नाच्या मंजुरीनंतर या लसींची संख्या चार झाली आहे. मॉडर्नाच्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्यता दिली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायहोल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायहोल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Embed widget