Covid Vaccination Update : देशात लसीकरण मोहीमेला वेग; 60 वर्षांवरील 49 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस
केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 44 वयोगटातील जवळपास 59.7 कोटी लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर एक मेपासून 24 जूनपर्यंत 56 टक्के लसीचे डोस ग्रामीण भागांत देण्यात आले आहेत.
Corona Vaccination : सध्या कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाला वेठीस ठरलं आहे. अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाय सापडला नसला तरी कोरोना लसीकरणामुळे कोरोनापासून काही अंशी बचाव करणं सहज शक्य होत असल्याचं तज्ज्ञांच म्हणणं आहे. अशातच जगासह भारतातही कोरोना लसीकरण मोहीमेनं वेग धरला आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या जवळपास 49 टक्के लोकसंख्येला कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 33.1 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. 21 जूनपासून 28 जूनपर्यंत दररोज 57.68 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
18 ते 44 वयोगटातील 15 टक्के लोकांनी घेतली लस
एक मेपासून 24 जूनपर्यंत 56 टक्के लसीचे डोस ग्रामीण भागांत देण्यात आले आहेत. तर 44 टक्के लसीचे डोस शहरी भागांत देण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 18 ते 44 वयोगटातील जवळपास 59.7 कोटी नागरिकांपैकी 15 टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
45 ते 59 वयोगटात 42 टक्के लोकांचं लसीकरण
आरोग्यमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 45 वर्ष ते 59 वर्ष वयोगटातील नागरिकांची लोकसंख्या जवळपास 20.9 कोटी आहे. ज्यापैकी 42 टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. दहा मे रोजी सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद केल्यानंतर कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत 85 टक्क्यांनी घट झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, देशात कोरोना लसीकरण मोहीमेत 21 जूनपासून अधिक जलद झाल्याचं पाहायला मिळत आहे. आठ दिवसांच्या आतमध्ये जवळपास 4.61 लसीचे डोस देण्यात आले आहेत. जे इराक (4.02 कोटी), कॅनडा (3.77 कोटी), सौदी अरेबिया (3.48 कोटी) आणि मलेशिया (3.23 कोटी) लोकसंख्येहून अधिक आहे.
देशातील कालची (मंगळवार) कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 3 लाख 16 हजार 897
कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा : दोन कोटी 93 लाख 66 हजार 601
एकूण सक्रिय रुग्ण : 5 लाख 52 हजार 659
एकूण मृत्यू : 3 लाख 97 हजार 637
महत्त्वाच्या इतर बातम्या :