Diabetes : देशाला मधुमेहाचा विळखा; एकट्या गुजरातमध्ये मधुमेहाचे 8 टक्के रुग्ण, ICMR च्या अहवालातून स्पष्ट
Diabetes : गुजरामध्ये 8 टक्के मधुमेहाचे रुग्ण आहेत, तर 10.25 टक्के लोकं प्रीडायबेटिक स्तरातील आहेत. आयसीएमआरच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
Diabetes : भारतातील मधुमेहाची आकडेवारी समोर आल्यानंतर आता आयसीएमआरच्या अहवालातून गुजरातमधील मधुमेहाची आकडेवारी देखील समोर आली आहे. डियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (Indian Council of Medical Research) अर्थात आयसीएमआरनं ही आकडेवारी ब्रिटनच्या लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित केली आहे. गुजरातमध्ये जवळपास 8 टक्के लोक हे मधुमेहाचे रुग्ण आहेत. तर 10.5 टक्के लोक हे प्रीडायबेटिक म्हणजे मधुमेह होण्याच्या टप्प्यावर आहेत. आयसीएमआरने नुकत्यास सादर केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
या अहवालानुसार गुजरातमध्ये, उच्च रक्तदाबाचे प्रमाण 28.5 टक्के, सामान्य लठ्ठपणाचे प्रमाण 23.5 टक्के आणि पोटाच्या लठ्ठपणाचे प्रमाण 30.6 टक्के आहेत. दरम्यान ही आकडेवारी राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मधुमेह हा असा आजार आहे ज्यावर अजून तरी कोणतेच निदान झाले नाही. परंतु साखर नियंत्रित करणे हे मधुमेहासाठी अत्यंत गरजेचे असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
गुजरातमधील डायबेटोलॉजिस्ट डॉ रमेश गोयल यांनी म्हटलं की, 'काळानुसार ज्या लोकांना मधुमेह आहे किंवा ज्या लोकांना कधीही मधुमेह होऊ शकतो ते लोक त्यांची साखर नियंत्रित करण्यासाठी व्यवस्थित काळजी घेत आहेत. तसेच मधुमेहासाठी असणारे औषधोपचार आणि पथ्यपाणी देखील हे लोकं सांभाळत आहे.'
आयसीएमआरने दिलेल्या अहवालानुसार गेल्या चार वर्षात चार कोटी लोकांना मधुमेहाची लागण झाली आहे. तसेच आधीच्या तुलनेत जवळपास ही टक्केवारी 44 टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये भारतातील अनेक राज्यांची टक्केवारी आयसीएमआरने त्यांच्या अहवालामध्ये दिली आहे. यामध्ये (26.4 टक्के), पुदुच्चेरी (26.3 टक्के) आणि केरळ (25.5 टक्के) या राज्यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे. तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश बिहार आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये मधूमेहाचे प्रमाण सर्वात कमी आहे तसेच आयसीएमआरच्या या अहवालानुसार, भारतात जवळपास 10.1 कोटींहून अधिक रुग्ण आहेत. दोन वर्षांपूर्वी तब्बल 74 दशलक्ष भारतीयांना मधुमेहाचे निदान झाले होते. तर 2045 पर्यंत ही संख्या 124 दशलक्षांवर जाण्याची शक्यता देखील तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
सध्या लोकांची बदलेले राहणीमान, खाण्याच्या वेळा, कामाचा ताण यांमुळे हल्ली सहज मधुमेहासारख्या आजाराचे निदान होत असल्याचं आता सांगण्यात येत आहे. त्यामुळे योग्य वयात योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देखील डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Diabetes : मधुमेहाचा वाढता विळखा! 10 पैकी एका व्यक्ती डायबेटिक, अहवालात धक्कादायक माहिती समोर