Women Safety : महिलांनो..तुमच्याकडे आहे 'ही' सर्वात मोठी ताकद! अचानक कोणी हल्ला केला तर सुरक्षेसाठी करा 'ही' तयारी, जाणून घ्या..
Women Safety : कोलकाता बलात्कार आणि बदलापूरात घडलेल्या अमानुष घटनेनंतर मुलींनी स्वतःचे संरक्षण कसे करावे? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
Women Safety : नुकत्याच झालेल्या कोलकाता (Kolkata Rape Case) आणि बदलापूर (Badlapur Case) अत्याचाराने लोकांना हादरवून सोडले आहे. एका डॉक्टर तरुणीवर तसेच शाळकरी शाळकरी मुलीवर ज्या अमानुष अत्याचार झाला, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रत्येकाला चीड आणणाऱ्या घटनेनंतर मुली तसेच महिलांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. साहजिकच, अशा अनुचित घटना किंवा असे अपघात पूर्वसूचनाशिवाय कधीच येत नाहीत. अशा परिस्थितीत मुली स्वतःला वाचवण्यासाठी कोणत्या सेफ्टी टिप्सचा अवलंब करू शकतात? जाणून घेऊया..
महिलांनो.. तुमच्याकडे 'ही' सर्वात मोठी ताकद
सध्या काही महिलांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो, अशा महिलांवर कोणत्याही प्रकारचे हल्ले जास्त प्रमाणात होतात. गुन्हेगार फक्त अशा मुली आणि महिलांनाच टार्गेट करतात, ज्यांना ते सोपे लक्ष्य वाटतात. अशात जेव्हाही तुम्ही रस्त्यावर एकटे चालता, तेव्हा घाबरलेल्या मुलीसारखे न जाता सैनिकासारखे चालावे. चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसायला हवा. चालताना, जमिनीकडे डोके करून चालण्याऐवजी, सावधगिरीने पुढे पाहिल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो. जर तुम्हाला कोणताही मार्ग माहित नसेल तर तो अज्ञात लोकांसमोर माहित करणे टाळा.
निर्जन रस्त्यांवर हेडफोन घालून चाला
असे अनेक प्रसंग येतात, जेव्हा महिलांना घराबाहेर पडून निर्मनुष्य असलेल्या किंवा कमी गर्दी असलेल्या रस्त्यांवर चालावे लागते. अशा वाटेवरून चालत असाल तर कानात हेडफोन लावा. हेडफोन घालण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही चालत असताना गाणं ऐकता, परंतु जेव्हा तुम्हाला असे वाटते की कोणीतरी तुमच्या मागे येत आहे तेव्हा ते उपयुक्त ठरते. जर तुम्हाला असे वाटत असेल तर लगेच फोनवर कोणाशी तरी बोलणे सुरू करा किंवा समोरच्या व्यक्तीला तुम्ही कोणाशी तरी बोलत आहात असे ढोंग करा. गुन्हेगाराला हे समजले पाहिजे की तुमच्या ओळखीचे कोणीतरी त्याला भेटणार आहे. ही भीती गुन्हेगाराला गुन्हे करण्यापासून थांबवेल आणि तुम्हाला सुरक्षित ठेवेल.
पर्समध्ये परफ्युम आणि स्प्रे ठेवा.
जर कोणी तुमच्यावर अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही धैर्याने वागले पाहिजे. ठोसा, कोपर आणि लाथ यांचा वापर केला पाहिजे. हल्लेखोराला पराभूत करण्यासाठी या पद्धती पुरेशा आहेत. जर कोणी तुम्हाला छेडण्याचा प्रयत्न करत असेल किंवा गुन्हा करण्याच्या उद्देशाने तुमच्याकडे जात असेल तर तुम्ही त्याला जोरदार लाथ मारून दुखवू शकता. यासाठी मुलींनी घराबाहेर पडताना पर्समध्ये परफ्युम, हिट किंवा स्प्रे ठेवणे गरजेचे आहे. स्वसंरक्षणासाठी या अतिशय उपयुक्त गोष्टी आहेत. गुन्हेगाराच्या डोळ्यात आणि तोंडात फवारणी केल्यामुळे समोरची व्यक्ती काही काळ कमकुवत होईल आणि ही कमजोरी तुमची ताकद बनेल.
पेनानेही करता येईल संरक्षण
पेन सुरक्षित कसे आहे? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण तुमच्या पेनचा वापर केवळ लिहिण्यासाठी नाही तर ते संरक्षणाचाही एक उत्तम मार्ग आहे. जर तुमच्याकडे पेन असेल आणि अचानक कोणी तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही या पेनने त्याच्या हातावर, मानेवर किंवा मांडीवर हल्ला करू शकता. जर कोणी तुमच्याशी जबरदस्ती करत असेल किंवा गैरवर्तन करत असेल तर त्याला ब्लॉक पंचने मारा. कानांच्या वरच्या आणि कपाळाच्या बाजूच्या नसा खूप कमकुवत असतात. तेथे दुखापतीमुळे, एखादी व्यक्ती 2 मिनिटे बेशुद्ध होऊ शकते. हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.
कोणतीही अनुचित घटना घडल्याचा संशय आल्यास...
मुलींनी स्वतःचे संरक्षण कसे करावे हे माहित असले पाहिजे. यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही गैरकृत्य झाल्याचा संशय आल्यास लगेच पोलिसांना 100 क्रमांकावर कळवा. याशिवाय दागिने घालून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. तुम्ही घरी असाल तर कोणत्याही अनोळखी व्यक्तीसाठी दार उघडू नका. याशिवाय ऑटो किंवा कॅबमध्ये बसताना आधी त्याचा नंबर नोंदवून घ्या आणि तो तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना पाठवा.
हेही वाचा>>>
Women Safety : महिलांनो... कॅब-ऑटो चालकाच्या विचित्र वागण्याची भीती वाटते? तर 'अशा' प्रकारे स्वतःचे संरक्षण करू शकता.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )