Health : तुम्हीही रात्री झोपताना दूध पिता? आजच ही सवय सोडा, 'या' आजारांना आमंत्रण देताय
Health : तुम्हाला माहित आहे का? की रात्री झोपताना दूध पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

Health : दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. असं शतकानुशतके आपले वडीलधारी मंडळी सांगत आले आहेत... आणि आपण त्यानुसार ऐकत आलो आहोत... हो की नाही?? मुलांना त्यांच्या आहारात दूध दिले जाते तर प्रौढांना दुग्धजन्य पदार्थांच्या रूपात त्यांच्या आहारात ते समाविष्ट केले जाते. बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी दूध पितात, परंतु तुम्हाला माहित आहे का? की रात्री झोपताना दूध पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. बहुतेक लोक दुधाच्या फायद्यांबद्दल बोलतात, परंतु ते पिण्याच्या योग्य वेळेबद्दल कोणीही बोलत नाही. दैनंदिन धावपळीच्या जीवनात, फार कमी लोकांना सकाळी किंवा दिवसा दूध पिण्याची सवय असते किंबहुना वेळ नसतो. अशात लोक रात्री झोपण्यापूर्वी दूध पितात. दूध पिण्याचे तसे अनेक आरोग्य फायदे आहेत, मात्र रात्रीच्या वेळी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
जाणून घेऊया रात्री दूध प्यायल्याने होणारे नुकसान.
वजन वाढणे
रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने अनेक लोकांचे झोपेचे चक्र सुधारते आणि त्यांना चांगली झोप घेण्यास मदत होते. मात्र, यामुळे तुम्हाला लठ्ठपणाही होऊ शकतो. रात्री एक ग्लास गरम दूध पिणे म्हणजे वजन वाढणे. यामुळे तुमची दैनंदिन कॅलरी संख्या वाढू शकते, ज्यामुळे वजन वाढू शकते.
पचन समस्या
रात्री दूध प्यायल्याने पचनास त्रास होऊ शकतो, कारण तुमचे शरीर रात्री कोणतीही शारीरिक क्रिया करत नाही. यामुळे तुमच्या पोटातील पचनक्रिया मंदावते.
इन्सुलिनच्या कार्यावर परिणाम
रात्री दूध प्यायल्याने तुमच्या इन्सुलिनच्या उत्सर्जनावरही परिणाम होऊ शकतो. दुधात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे Circadian Rhythm
प्रभावित होऊ शकते. हे आपल्या शरीरासाठी चांगले नाही. याशिवाय हृदयाशी संबंधित आजारही होऊ शकतात.
घशातील कफ
रात्री दूध प्यायल्याने अनेकांना कफ तयार होण्याची समस्या भेडसावू शकते. जास्त कफ तयार झाल्यामुळे, एखाद्याला श्वासोच्छवासाचा त्रास, घशातील संसर्ग आणि नाक वाहणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
ऍलर्जी होऊ शकते
रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने अधिक संवेदनशील लोकांमध्ये दुधाची ऍलर्जी होऊ शकते. त्याच्या उपचारासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जावे लागेल. त्यामुळे दूध पिण्यापूर्वी स्वतःची चाचणी करून घ्या.
दातांच्या आरोग्यासाठी वाईट
दुधामध्ये भरपूर साखर असते, त्यामुळे झोपण्यापूर्वी आणि नंतर ब्रश न करता झोपल्याने दातांमध्ये पोकळी निर्माण होऊ शकते. याशिवाय दात किडू शकतात.
हेही वाचा>>>
Child Health : पालकांनो..मोबाईलच्या व्यसनानं लहान वयातच मुलं होतायत 'सर्वाइकल पेन' चे शिकार, 'ही' लक्षणे दिसल्यास सतर्क व्हा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
