Cooking Tips : कारल्याच्या भाजीचा कडूपणा घालवायचाय? मग, या टिप्स खास तुमच्यासाठी...
Cooking Tips : कारल्याची भाजी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, पण काही लोक ती कडूपणामुळे खात नाहीत. आज आम्ही तुम्हाला कारल्याचा कडूपणा दूर करण्याच्या टिप्स सांगणार आहोत. यामुळे कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही.
Cooking Tips : उन्हाळ्यातील आरोग्यदायी भाज्यांमध्ये कारल्याचा समावेश होतो. ही एक अतिशय आरोग्यदायी भाजी आहे. कारले खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. जर, तुम्हाला आजारांपासून दूर राहायचे असेल, तर तुमच्या आहारात कारल्याचा अवश्य समावेश करा. विशेषत: मुलांना कारले खायला अजिबात आवडत नाही. कारले कडू असते, अशी मुलं तक्रार करतात, कडू भाजी कोणी कशी खाऊ शकेल? त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. यामुळे कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही.
नीट सोलून घ्या : सर्व प्रथम कारल्याची साल सोलून घ्या. कडवटपणा दूर करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. कारल्याची संपूर्ण कडू त्वचा काढून टाका. त्यातच सर्वात जास्त कडूपणा असतो. या सालींमध्ये थोडे मीठ टाकून उन्हात वाळवा आणि मसाला लावून तळून खा. भरलेली कारली बनवताना त्याचा सारणात वापर करता येतो.
बिया काढून टाका : कारल्याचा कडूपणा दूर करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे कारल्याची भाजी करताना त्यातील सर्व बिया काढून टाकणे. कारल्याच्या बियांमध्येही कडूपणा असतो. त्यामुळे भाजी चिरत असताना त्यातील बिया चमच्याच्या सहाय्याने काढून टाका.
मीठ लावून ठेवा : कारले बनवण्याआधी थोडावेळ मीठ लावून ठेवा, याने कारल्याचा कडूपणा दूर होईल. कारल्याचा कडू रस मिठात असणाऱ्या खनिजांमुळे बाहेर पडतो. कारल्याला साधारण 20 ते 30 मिनिटे मीठ लावून ठेवा. त्यानंतर कारले धुवून घ्या. आता तुमची भाजी कडू होणार नाही.
दही वापरा : कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी तुम्ही भाजीत दही देखील वापरू शकता. यासाठी कारल्याचे छोटे तुकडे करून 1 तास दह्यात ठेवा. याने कारल्याचा कडूपणा निघून जातो आणि दह्यामधून बाहेर काढल्यानंतर कारल्याची भाजी करा.
कांदा आणि बडीशेप : जर तुम्ही कारल्याची सुकी भाजी बनवत असाल तर त्यात कांदा आणि बडीशेप वापरा. यामुळे भाजीचा कडूपणा दूर होईल. यासाठी प्रथम तेलात बडीशेप घाला आणि नंतर कांदा थोडा मोठा कापून घाला. आता कारले आणि मीठ घालून परतून घ्या. त्यानंतर थोडी आमचूर पावडर घाला. यामुळे भाजी अजिबात कडू होणार नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :