एक्स्प्लोर

माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते; प्राजक्ता माळीने सगळंच काढलं

माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे. तुम्ही राजकारणी आहात, आम्ही कलाकार आहोत. तुम्ही तुमचं राजकारण करा, पण आम्हाला कलाकारांना का मध्ये घेता

मुंबई : बीडमधील हत्याप्रकरणाच्या राजकीय वादात मंत्री धनंजय मुंडेंचं (Dhananjay munde) नाव घेताना आमदार सुरेश धस यांनी काही महिला कलाकारांची नावे घेत परळीतील सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख केला होता. त्यामध्ये, अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतल्यानंतर आज अभिनेत्री, लेखिका प्राजक्ता माळी यांच्याकडून मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी,पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळीचं (Prajakta mali) कंठ दाटून आल्याचं पाहायला मिळालं. तसेच,  माझ्या भावाने सोशल मीडिया बंद केला, आई रात्रभर झोपली नाही, आमच्या कुटुंबाला मोठा त्रास होत असल्याचे सांगत गेल्या दीड महिन्यांपासून मी हे सर्व सहन करत होते. मात्र, एका लोकप्रतिनिधीने माझं नाव घेतल्यामुळे मी आज समोर येऊन बोलत आहे, असे प्राजक्ता माळीने म्हटले. तसेच, आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी जाहीरपणे माफी मागावी, असेही तिने म्हटले.

गेल्या दीड महिन्यांपासून हे सुरू आहे. माझ्यावर टीका होतेय पण मी शांत आहे. पण, मी शांत बसते म्हणजे माझी मूकसंमती नाही, असे म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषदेत बोलायला सुरुवात केली. आमदार सुरेस धस यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी मी आज पत्रकार परिषद घेत आहे, असेही प्राजक्ता हिने म्हटले.  माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे. तुम्ही राजकारणी आहात, आम्ही कलाकार आहोत. तुम्ही तुमचं राजकारण करा, पण आम्हाला कलाकारांना का मध्ये घेता. परळीला केवळ महिला कलाकारच येतात का, पुरुष कलाकार कधी गेल्याच नाहीत का परळीला. महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे शोभत नाही, तुम्ही महिला कलाकारांच्या चारित्र्यावर संशय घेत नाहीत, तर त्यांच्या कर्तृत्वावर देखील तुम्ही प्रश्न उपस्थित करते, असे म्हणत प्राजक्ता माळीने आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार पलटवार केला. तसेच, मी महिला आयोगाकडे याबाबत तक्रार केली असून कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केल्याचही प्राजक्त माळीने म्हटले.  

प्राजक्ता माळीकडून खंत व्यक्त

हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे कुठल्या कुठे आमच्यावर बेतलेलं आहे. आपल्या कुठल्यातरी रागाच्या भरात कोणी काहीतरी बरळून जाते. त्यानंतर त्या दोन वाक्यांचे मीडिया हजार व्हिडिओ करते, तेवढेच शब्द पकडते आणि यूट्यूब चॅनेलवर हजार व्हिडिओज बनतात. मग एका सेलिब्रिटीला त्याच्यावर व्यक्त करण्यास भाग पाडलं जातं. मग ती बोलते, मग परत पहिल्या व्यक्तीला वाटतं आता आपण बोललंच पाहिजे आणि हे चालू राहते. महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचे मनोरंजन होतं राहते, अशा शब्दात प्राजक्त माळीने खंत व्यक्त केली. 

हेही वाचा

मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget